मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'राज ठाकरे आधी असे नव्हते', शरद पवारांवरील टिकेनंतर रुपाली ठोंबरेंनी सुनावलं

'राज ठाकरे आधी असे नव्हते', शरद पवारांवरील टिकेनंतर रुपाली ठोंबरेंनी सुनावलं

फाईल फोटो

फाईल फोटो

राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरेंना सुनावलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India
  • Published by:  Khushalkant Dusane

पंढरपूर, 1 डिसेंबर : 'शिवरायांचा अवमान हा जातीय राजकारणासाठी केला जात आहे. जातीय राजकारणासाठी शिवरायांचं नाव वापरलं जात आहे. या सर्वांची सुरुवात राष्ट्रवादीने केली' अशी टीका राज ठाकरे यांनी केली. शरद पवार कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. शाहू-फुले-आंबेडकर हीच नाव घेतात, शरद पवार महाराजांचं नाव का घेत नाहीत, असा टोला राज ठाकरेंनी पवारांना लगावला. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरेंना सुनावलं आहे.

भाजपाच्या असणाऱ्या दबावामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका बदलली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि पूर्वाश्रमीच्या मनसेच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंसंदर्भात आपले मत व्यक्त केले.

काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे -

राजसाहेब पूर्वी असे नव्हते. ठाकरेशाही आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपणारे राज ठाकरे आता बदलले आहेत, असे मत रूपाली ठोंबरे पाटील यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. त्याचबरोबर पंढरपूरच्या कॉरिडॉरला हा राष्ट्रवादीचा पूर्णपणे विरोध असेल. व्यावसायिक व घरदार पाडून कुठलाही विकास करू नये वारकऱ्यांना अपेक्षित असणारा विकास करावा, अशी भूमिकाही यावेळी रूपाली ठोंबरे आणि माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - राष्ट्रवादीने जातीच्या राजकारणासाठी वापरलं शिवरायांचं नाव, राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा

राज ठाकरे कोकण दौऱ्यावर -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहे. याआधी त्यांनी परवा कोल्हापुरात अंबामातेचे दर्शन घेतले. कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई महापालिका स्वतंत्र लढणार, असे यावेळी त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीची ही तयारी समजा. उत्साही लढा हा प्रस्थापितांच्या विरोधात असतो. यापूर्वी मला यामध्ये यश आले आहे. बालेकिलले हलत असतात. यानंतरही हलतील, असे आव्हान त्यांनी विरोधकांना देत मुंबई महापालिका स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केले.

गेल्या वर्षी रुपाली ठोंबरेंनी दिला होता मनसेचा राजीनामा -

डॅशिंग नेत्या म्हणून नावलौकिक असलेल्या रुपाली ठोंबरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला होता. 'मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी स्पष्टपणे पत्रात लिहिलं होतं.

First published:

Tags: MNS, Raj Thackeray, Rashtra vadi congress party, Solapur