नांदेड 02 डिसेंबर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या पुन्हा एकदा चिघळलेला आहे. अशातच आता याचं लोण मराठवड्यापर्यंत गेल्याचं पाहायला मिळत आहे. नांदेडच्या सीमेवर असलेल्या धर्माबाद तालुक्यातील 25 गावांनीही आता तेलंगणा राज्यात सामील होण्याचा इशारा दिला आहे. या भागातील गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने जनता संतप्त असल्याचं सांगितलं जात आहे.
Eknath Shinde : अखेर जत तालुक्याला न्याय मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा
या गावांचे सरपंच आणि त्यांचे समर्थक यांची बासर येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये त्यांनी तेलंगणामध्ये सामील होण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही सीमा भागातील गावांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे जनतेचा आक्रोश असल्याचं सरपंचांनी सांगितलं आहे.
वाढता भ्रष्टाचार, रस्त्याची दुरवस्था, पाण्याची टंचाई या सगळ्यांचा सामना या गावातील लोक करत आहेत. त्यामुळे यापेक्षा तेलंगणा सरकारच्या योजना अधिक प्रभावशाली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दुसरी बाब म्हणजे प्रांत रचना होण्याच्या आधी हा संपूर्ण परिसर निजामकालीन हैदराबाद राज्यात होता. त्यामुळे या गावांनी आता पुन्हा तेलंगणा राज्यात सामील होण्याचा इशारा दिला आहे.
'राज ठाकरे आधी असे नव्हते', शरद पवारांवरील टिकेनंतर रुपाली ठोंबरेंनी सुनावलं
जत तालुक्यातील गावांनीही घेतला मोठा निर्णय -
मागच्या काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा केला होता. तसेच त्यांनी अक्कलकोट आणि सोलापूरही कर्नाटकचाच भाग असल्याचेही सांगितलं. यानंतर जत तालुक्यातील 40 गावांना कर्नांटक सरकारने पाणी दिल्याने या 40 गावांनी कर्नाटकात विलीन होण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जत पाणी प्रश्वावर मोठा तोडगा काढला आहे. एकनाथ शिंदे यांनी तातडीने पाऊले उचलत जतमधील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तब्बल 2 हजार कोटींचं टेंडर काढणार असल्याची घोषणा केली आहे. यानंतर आता नांदेडमधील गावांनीही तेलंगणात सामील होण्याचा इशारा दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.