Home /News /mumbai /

योगींसाठी अक्षय कुमार आंब्याची टोपली घेऊन गेला असेल, संजय राऊतांचा टोला

योगींसाठी अक्षय कुमार आंब्याची टोपली घेऊन गेला असेल, संजय राऊतांचा टोला

    मुंबई, 2 डिसेंबर: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) बुधवारी मुंबईच्या (Mumbai) दौऱ्यावर आले आहेत. ते दोन दिवस मुंबईत थांबणार आहेत. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी तयार करण्यासाठीच्या चर्चेसाठी त्यांचा हा दौरा आहे. सर्वात आधी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Bollywood Actor Akshay Kumar) याने मुख्यमंत्री योगींची भेट घेतली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अक्षय कुमार याच्यावर निशाणा साधला आहे. 'योगी आदित्यनाथ मुंबईत आले आहे. ते योगी आहेत. मुंबईच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ते थांबले आहेत. त्यांच्यासोबत अक्षय कुमार देखील बसला असल्याचं मी पाहिलं. कदाचित अक्षय कुमार त्यांच्यासाठी आंब्याची टोपली घेऊन गेला असेल, अशा शब्दांत संजय राऊतांनी अक्षय कुमार याला टोला लगावला आहे. हेही वाचा...लधाड्यांनो, हे मतांसाठी लांगूलचालन नाही का? 'अजान'वरून सेनेचा भाजपला सवाल मुंबईची फिल्म सिटी (mumbai film city) कोणी येथून घेऊन जाण्याचं बोलत असेल तर त्याआधी योगींनी हे सांगावं की नोएडा फिल्म सिटीची सध्याची अवस्था काय आहे?, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत म्हणाले, मुंबईतील फिल्म सिटी कोणी इकडून नेण्याची गोष्ट करत असेल तर तो विनोद आहे. हे काही सोपं नाही, याचा खूप मोठा इतिहास आहे. आम्हा सर्वांचे रक्त आणि घाम वाहिला आहे. योगी आदित्यनाथांना मी एढेच विचारू इच्छितो तुम्ही कोणताही मोठा प्रकल्प तयार करू इच्छित असाल तर करा. परंतु नोएडामध्ये जी फिल्म सिटी तयार केलेली त्याची आज काय परिस्थिती आहे. त्या ठिकाणी किती चित्रपटांचे चित्रीकरण केले जाते? हे पण जरा मुंबईत येऊन त्यांनी सांगा' असा सवाल राऊतांनी योगींना केला आहे. योगींचा पंगा मुंबईशीच आहे? मुंबई ही मुंबई आहे. मुंबईचं महत्व कमी होऊ शकत नाही. फिल्मसिटी उभारण्यासाठी योगींना शुभेच्छा आहेत. नोएडातील फिल्मसिटीचं काय झालं? असा सवाल राऊत यांनी थेट योगी आदित्यनाथ यांना केला आहे. योगींचा पंगा मुंबईशीच आहे? असा इशाराही राऊत यांनी दिला आहे. फिल्मसिटी निर्जीव नसते. बॉलिवूडकरांचे बंगले यूपीत नेणार? 'अजाणवरून हिंदू-मुस्लिम राजकारण नको, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. दुसरीकडे, मनसेपाठोपाठ आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasheb Thorat) आणि ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar shinde) यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका केली आहे. 'बॉलिवूड आणि कलाकार यांचे प्रेम मुंबई शहारावर आहे, त्यामुळे ते येथेच राहतील, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लगावला. तसंच, 'योगी आदित्यनाथ मुंबईतील फिल्मसिटीला उत्तर प्रदेशमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही थोरात यांनी केला आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. 'योगी आदित्यनाथ यांनी किती ही प्रयत्न केले, तरी मुंबईतील चित्रपटसृष्टी बाहेर जावू शकत नाही' असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहे. हेही वाचा..राष्ट्रवादी कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणाला नवे वळण, धक्कादायक माहिती समोर मनसेनं लावले भाजपच्या मुख्यालयाबाहेर होर्डिंग दरम्यान, फिल्मसिटीच्या मुद्यावरून मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत योगी आदित्यनाथ ट्रायडंट हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. याच हॉटेलच्या खाली मनसेचे घाटकोपर येथील विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांना युपीचा "ठग" म्हटले आहे. 'कहा राजा भोज...और कहा गंगू तेली.., कुठे महाराष्ट्राचं वैभव...तर कुठे युपीचं दारिद्र. भारतरत्नं दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपट सृष्टी, युपीला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्नं.' 'अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला "ठग" असे मजकूर असलेले होर्डिंग योगी आदित्यनाथ थांबलेल्या हॉटेलच्या परिसरात लावले आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Akshay Kumar, Bollywood, Sanjay raut, Shiv sena, Uttar pardesh, Yogi Aadityanath

    पुढील बातम्या