Home /News /crime /

राष्ट्रवादी कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणाला नवे वळण, धक्कादायक माहिती समोर

राष्ट्रवादी कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणाला नवे वळण, धक्कादायक माहिती समोर

रेखा जरे यांच्यावर 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता.

    अहमदनगर, 02 डिसेंबर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्या रेखा जरे (Rekha Jare) यांची हत्या सुपारी देऊनच केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. राहता तालुक्यातील कोल्हार परिसरातून रात्री दोघांना आणि कोल्हापूर येथून एकाला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्याव 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता.  मोटरसायकल क्रमांक एम एच 17-2380 वरून आलेल्या दोन अज्ञात 25 ते 30 वयोगटातील तरुणांनी गाडीला धक्का लागल्याचे कारणावरून रेखा जरे यांच्याशी वाद घातला होता. काही वेळाने  या तरुणांनी धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्या गळ्यावर वार केले होते. FASTag नसेल तरी नो टेन्शन! हे काम केल्यास भरावा लागणार नाही दुप्पट टोल जखमी अवस्थेत रेखा जरे यांना तातडीने  जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले होते. मात्र, त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 6 पथके तयार केली होती. खडीने भरलेला ट्रक कारवर उलटून भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू सुरुवातील त्यांच्या गाडीला कट मारल्याचा कारणावरून त्यांचावर हल्ला करण्यात आला असं सांगण्यात आले होते. पण पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला असता धक्कादायक कारण समोर आले. रेखा जरे यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आली असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोल्हापूरमधून फरार आरोपीला अटक केली आहे. रेखा जरे यांची हत्या करण्यामागे कारण  काय आहे, याचा तपास पोलीस करीत करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या