Home /News /mumbai /

ट्रोलधाड्यांनो, हे मतांसाठी लांगूलचालन नाही का? 'अजान'वरून सेनेचा भाजपला सवाल

ट्रोलधाड्यांनो, हे मतांसाठी लांगूलचालन नाही का? 'अजान'वरून सेनेचा भाजपला सवाल

'शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडेही वळली आहेत याचे भान राखा स्वतः मतांच्या लांगूलचालनासाठी बांग द्यायची व दुसऱ्यांच्या अजानवर आक्षेप घ्यायचा. कोणत्याही धर्मीयांच्या भावनांचा आदर करणे म्हणजे हिंदुत्वाला सोडचिठ्ठी असे होत नाही'

पुढे वाचा ...
    मुंबई, 02 डिसेंबर : ' शिवसेनेने (Shivsena) ‘अजान’प्रकरणी हिंदुत्वास सोडचिठ्ठी दिल्याचे जे दात उचकटून बोलत आहेत त्यांच्या दाताडांत ‘ईद’च्या शिरकुरम्याची, बिर्याणीची शिते अडकल्याची साग्रसंगीत छायाचित्रेच प्रसिद्ध झाली आहेत. शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडेही वळली आहेत याचे भान राखा स्वतः मतांच्या लांगूलचालनासाठी बांग द्यायची व दुसऱ्यांच्या अजानवर आक्षेप घ्यायचा. कोणत्याही धर्मीयांच्या भावनांचा आदर करणे म्हणजे हिंदुत्वाला सोडचिठ्ठी असे होत नाही' असं म्हणत शिवसेनेनं अजान प्रकरणावरून भाजपवर (BJP) टीका केली आहे. तसंच, 'बाबरीचे ढाचे कोसळताच ज्यांनी बगला वर केल्या त्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणे हा विनोदच आहे' असा टोलाही सेनेनं लगावला. शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लिम बांधवांच्या एका स्वयंसेवी संस्थेने आयोजिलेल्या अजान स्पर्धेचे कौतुक केले व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. या मुद्यावरून भाजपने सेनेवर जोरदार टीका केली होती. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या (saamana editorial) अग्रलेखातून भाजपच्या टीकेला जशास तसे उत्तर देण्यात आले आहे. कमाईचा हिट फॉर्म्यूला! 5000 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा लाखो, सरकारही करेल मदत दक्षिण मध्य मुंबईतील बहुसंख्य भागात मुस्लिमांची वस्ती आहे. त्यांनीही खाली उतरून गर्दी करू नये. जे काही उपक्रम, उत्सव साजरे करायचे आहेत ते ‘ऑनलाइन’ म्हणजे डिजिटल माध्यमांचा वापर करून करा. शिवसेना याकामी आपल्याला मदत करेल. हा विषय एवढ्यापुरता आणि इतकाच मर्यादित असताना भाजपच्या तांडवेश्वरांनी हाती माकडी कोलिते घेऊन नाचण्याचा प्रकार सुरू केला' असं म्हणत भाजपच्या नेत्यांना टोला लगावला आहे. 'बांगलादेशी घुसखोर, पाकडे, रोहिंगे मुसलमान यांच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका कठोर आहे; पण आतापर्यंत मोदी सरकारने किती बांगलादेशींचे उत्खनन करून त्यांना बाहेर फेकले ते ‘ट्रोलभैरव भक्त मंडळी’ सांगू शकतील काय? मशिदीवरील भोंगा हा वादग्रस्त विषय आहे. मशिदीवरील भोंग्यामुळे इस्लाम मजबूत होत नाही व याबाबत केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून हा गोंधळ आणि ध्वनिप्रदूषण थांबवायला हवे. त्याचा हिंदुत्वाशी संबंध जोडला तरी हा विषय ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणाशीच निगडित आहे. आज सर्वाधिक भोंगे हे उत्तर प्रदेश, बिहारातील मशिदींवर आहेत. काश्मीर खोऱ्यातून 370 कलम हटवले तरी या भोंग्यांवरून लोकांना उकसविले जाते. तेसुद्धा रोखायला नको काय? असा सवाल सेनेनं भाजपला विचारला आहे. Sarkari Naukri: थेट मुलाखत देऊन DRDO मध्ये मिळेल नोकरी, दरमहा इतका मिळेल पगार आता एखाद्या अजान स्पर्धा प्रकरणावरून हिंदुत्वाच्या शुद्धतेचे मोजमाप करायचेच म्हटले तर लोकांच्या मनातील पुढील प्रश्नांची उत्तरेही मिळायला हवीत. लालकृष्ण अडवाणी हे पाकिस्तानात जाऊन मोहम्मद अली जीनांच्या कबरीवर फुले उधळून व जीना हे इतिहासपुरुष असल्याचे सांगून आलेच होते. पण तेव्हा तो म्हणे, राजशिष्टाचाराचा भाग होता. स्वतः पंतप्रधान मोदी हेसुद्धा खास विमानाने पाकिस्तानात उतरून नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाचाच केक कापून आले. त्या केकची शिते त्यावेळी अनेकांच्या दाढीत अडकलीच होती. तेव्हा मात्र भाजपचे हिंदुत्व पातळ झाले नाही, तर तो एक ‘मास्टर स्ट्रोक’ होता. तर दुसरीकडे भाजपने गोवंश हत्याबंदीचा कायदा केला. त्यामुळे गोमांस खाणे आणि बाळगणे हा गुन्हा ठरला. त्यातून हिंदुत्व प्रखर झाल्याचा प्रचार झाला; पण आजही गोव्यापासून ईशान्येकडील भाजपशासित राज्यांत गोमांस विक्री अधिकृतपणे सुरूच आहे. ही विक्री बंद केली तर त्या राज्यातील भाजपच्या मतांवर परिणाम होईल म्हणून सगळं ‘बिनबोभाट’ सुरू आहे. मग काय हो ‘ट्रोलधाड्यांनो, हे मतांसाठी लांगूलचालन की काय ते नाही काय?’ असा सवालच सेनेनं उपस्थितीत केला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: भाजप, मुंबई, शिवसेना

    पुढील बातम्या