राजकारण तापलं! शिवसेनेतर्फे 'या' शहरातही झळकले #wesupportSanjayRaut चे बॅनर

राजकारण तापलं! शिवसेनेतर्फे 'या' शहरातही झळकले #wesupportSanjayRaut चे बॅनर

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना EDने एक जुन्या आर्थिक व्यवहारा प्रकरणी नोटीस बजावली आहे. त्यामुळे राज्यात रान पेटलं आहे.

  • Share this:

डोंबिवली, 29 डिसेंबर: राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील (MVA Government) आमदार आणि नेत्यांच्या कुटुंबीयांना अंमलबजावणी संचनालयाने (Enforcement Directorate (ED) नोटीस बजावल्यामुळे मुंबईसह राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना (Shiv sena) आक्रमक झाली आहे.

शिवसैनिकांनी आपल्या जुन्या स्टाईलमध्ये आंदोलन सुरू केलं आहे. मुंबईतील ED कार्यालय, भाजपच्या कार्यालयाबाहेर (BJP Office Mumbai) होर्डिंग ठोकल्यानंतर आता डोंबिवलीत शिवसेनेतर्फे #wesupportSanjayRaut चे बॅनर ठिकठिकाणी झळकले आहेत.

हेही वाचा..मुंबईत उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना EDने एक जुन्या आर्थिक व्यवहारा प्रकरणी नोटीस बजावली आहे. त्यामुळे राज्यात रान पेटलं आहे. खासदार राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्ष भाजप सडकून टीका केली होती. ED च्या चौकशीवर देखील त्यांनी सणसणीत टीका केली. त्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली असून डोंबिवली शिवसेनेतर्फे #wesupportSanjayRaut चे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर खासदार राऊत यांनी केलेली विधाने लिहिण्यात आली आहेत.

दरम्यान, येत्या काही महिन्यांमध्ये केडीएमसी आणि इतर महापालिका निवडणूक असल्यानं हाच मुद्दा घेऊन शिवसेना आक्रमक होऊ शकते, असंही जाणकारांचं मत आहे.

येथे भाजप विरोधी लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात...

दुसरीकडे, मुंबईतील भाजप प्रदेश कार्यलयाबाहेर शिवसेनेतर्फे सोमवारी रात्री होर्डिंग लावण्यात आलं. 'ED येथे भाजप विरोधी लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात.' अशा आशयाचा मजकूर त्यावर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा 'सामना' रंगला आहे.

ED कार्यालयावर 'भाजप प्रदेश कार्यालय'चं बॅनर...

शिवसैनिकांनी मुंबईतील ED कार्यालयाच्या बाहेर भाजप प्रदेश कार्यालय असं बॅनर लावण्यात आलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

संजय राऊतांनी केला खुलासा

खासदार संजय राऊत यांनी EDच्या नोटिसीबद्दल पहिल्यांदाच काल पत्रकार परिषदेत खुलासा केला. EDची नोटीस गेल्या दीड महिन्यांपूर्वी आली होती, अशी कबुलीही खासदार राऊत यांनी दिली.

'माझी पत्नी वर्षा राऊत हिच्या नावावर 10 वर्षांपूर्वी हा व्यवहार झाला होता. मध्यमवर्गीय घरातील मराठी शिक्षिका असलेल्या वर्षाने घर घेण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडून 50 लाखांचे कर्ज घेतले होते. त्यासंदर्भात ईडीला आता जाग आली आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पडत नाही म्हणून EDकडून नोटीस पाठवली जात आहे' असा खुलासाही राऊत यांनी केला.

हेही वाचा...निवडणुका घ्यायच्याच कशाला? सरपंचपदासाठी तब्बल 2 कोटींची लागली बोली

माझ्याकडे 20 कोटींचा हिशेब...

दरम्यान, खासदार राऊत यांनी भाजपवर देखील निशाणा साधलाय जर पैशांच्या व्यवहारांची चौकशीच केली जात असेल तर भाजपचं अकाऊंट उघडा. गेल्या 3 वर्षांमध्ये किती कोटींच्या देणग्या दिल्या आहेत. ते तपासा. त्याचा हिशेब भाजपच्या नेत्यांनी करावा. माझ्याकडे 20 कोटींचा हिशेब आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपला आव्हान दिलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 29, 2020, 12:30 PM IST

ताज्या बातम्या