Home /News /maharashtra /

निवडणुका घ्यायच्याच कशाला? सरपंचपदासाठी तब्बल 2 कोटींची लागली बोली

निवडणुका घ्यायच्याच कशाला? सरपंचपदासाठी तब्बल 2 कोटींची लागली बोली

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे गावात जाहीररित्या सरपंचपदाचा लिलाव करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

नाशिक, 29 डिसेंबर : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची (gram panchayat election 2021) रणधुमाळी आता सुरू झाली आहे. उमेदवारीचा अर्ज भरून उमेदवार मैदानात उतरले आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी आदर्श मागणी होत आहे. पण, दुसरीकडे नाशिकमध्ये (Nashik) सरपंचपदासाठी तब्बल 2 कोटींची बोली लागल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे गावात  जाहीररित्या सरपंचपदाचा लिलाव करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.  कांद्याची मोठी बाजारसमिती असलेलं हे गाव आहे.  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत सभा बोलवली होती. गावातील रामेश्वर मंदिराच्या परिसरात ही सभा पार पडली.  यावेळी सरपंचपदासाठी जाहीरपणे लिलाव घेण्यात आला. यावेळी लाखांपासून सुरू झालेली बोली थेट कोटींच्या घरात पोहोचली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास तात्या देवरे यांचे सुपुत्र आणि माजी सरपंच प्रशांत उर्फ चंदू देवरे यांच्या पॅनलने या लिलावासाठी तब्बल 2 कोटी 5 लाखांची बोली लावली. या पॅनलकडून सुनील दत्तू देवरे यांनी लावलेली ही बोली अंतिम ठरली. त्यानंतर सरपंचपद हे जाहीर करण्यात आले.  लिलाव पार पडल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणार असण्याची घोषणा करण्यात आली. बोली जिंकलेल्या पॅनलकडे ग्रामपंचायतीचा कारभार सोपवण्यात आला आहे. बोलीत लावलेली रक्कम ही उमरणे गावाचे देवस्थान असलेल्या रामेश्वर मंदिराच्या बांधकामामासाठी वापरली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या