Home /News /mumbai /

संचारबंदीची ऐशीतैशी, मुंबईत उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

संचारबंदीची ऐशीतैशी, मुंबईत उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

तंबाखूयुक्त हुक्का सेवन करण्यास कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे. पण, या पार्लरमध्ये सर्रासपणे याचा वापर केला जात होता.

    मुंबई, 29 डिसेंबर : कोरोनाचा नवी विषाणू (new coronavirus strain) आढळून आल्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी (night curfew) लागू करण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारच्या आदेशाला धाब्यावर बसवून मुंबईत मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर (hookah parlour) कारवाई करण्यात आली आहे. मुंबईला पोलिसांच्या क्राईम ब्रांचने सोमवारी रात्री उशिरा मालाड येथील मनरंगी हुक्का पार्लरवर छापा टाकला. बेकायदेशीररित्या हे पार्लर सुरू होते. या पार्लरमध्ये तंबाखू युक्त हुक्क्याचे सेवन केले जात असल्याचे तपासातून समोर आले. हा प्रसिद्ध अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह, शुक्रवारी केली होती ख्रिसमस पार्टी तंबाखूयुक्त हुक्का सेवन करण्यास कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे. पण, या पार्लरमध्ये सर्रासपणे याचा वापर केला जात होता. रात्री संचारबंदी असताना शटर बंद करून अवैधपणे हा हुक्का पार्लर सुरूच होते. पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळताचा छापा टाकण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात हुक्का आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये 7 कर्मचारी आणि 8 जणांना अटक करण्यात आली आहे. संचारबंदीचे उल्लंघन आणि कोविड काळात नियमाची पायमल्ली केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. IND vs AUS : अश्विनने मोडला मुरलीधरनचा विश्वविक्रम, हा रेकॉर्ड करणारा पहिलाच दरम्यान, वर्षाच्या स्वगातासाठी (new year celebration)सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, कोरोनाचा नवीन विषाणू सापडल्यामुळे खबरदारी घेत राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. थर्टी फर्स्टचं स्वागत करत असताना राज्य सरकारने (MVA Goverment) जनतेला 9 नियम आणि अटी घालून दिल्या आहे. 1. कोरोनाच्या अनुषंगाने 31 डिसेंबर 2020 रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि 1 जानेवारी 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे. 2. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) राहील तसंच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. 3. विशेषत: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. 4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. दोघेही चांगले डॉक्टर, पण रुग्णाची तपासणी सुरू असतानाच दिला पत्नीला तोंडी तलाक! 5. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसंच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. 6. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसंच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. 7. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. 8. कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पूनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. 9. तसंच या परिपत्रकानंतर 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्ष सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. अशा सूचना गृह विभागामार्फत निर्गमित करण्यात आल्या असून नागरिकांनी यांचे पालन करावे, असं आवाहन गृह विभागामार्फत करण्यात आले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या