मुंबई 15 जुलै : आमदार संजय शिरसाट यांनी आयोजित केलेल्या शिवसैनिक मेळाव्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हजेरी लावली. मध्यरात्री 1 च्या सुमारास रवींद्र नाट्यमंदिरात मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, की सरकारमध्ये होतो, मुख्यमंत्री आपला होता तरीही अपेक्षेप्रमाणे कामं झाली नाहीत. निवडणुकीत चौथ्या नंबरवर शिवसेना गेली. ज्या सरकारमध्ये शिवसेना आहे त्यात शिवसैनिकांना काय मिळालं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. Sanjay Raut & Sharad Pawar : फडणविसांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार, संजय राऊतांचा दौरा, नागपुरात भेट होण्याची शक्यता ते पुढे म्हणाले की जे आले त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नाही. तर त्यांची बांधिलकी मतदारसंघाशी आहे. मतदारसंघात कामं करायची असतील तर निधी हवा असतो. मतदारांना सामोरं जायचं आहे. त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत. मात्र, अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले गेले. अधिकार असताना, सरकार असताना आम्हाला शिवसैनिकांना मदत करता आली नाही, असंही त्यांनी बोलून दाखवलं. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की बाळासाहेब म्हणाले होते, सत्तेत असताना शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागता कामा नये. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय. मी माझ्या पक्षाशी काँग्रेस होऊ देणार नाही, असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. तेच बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय असं शिंदे यांनी म्हटलं. नवी मुंबईत शिवसेनेला पुन्हा धक्का; आणखी 5 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामील धर्मवीर आनंद दिघे सिनेमा काढला. तुम्हाला आवडला पण काही लोकांना पचला नाही. त्याचाही राग होता. कुणाला आवडो किंवा न आवडो, मी पर्वा करत नाही. धर्मवीर आनंद दिघेंसाहेबांनी बाळासाहेंबांना गुरू मानलं. आज आम्ही बाळासाहेबांचे, धर्मवीरांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे. आम्ही हा निर्णय का घेतला त्याचं आत्मपरिक्षण करण्यापेक्षा गद्दार, बंडखोर म्हटलं जातं. हा बंड नाही, उठाव आहे, क्रांती आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.