Home /News /mumbai /

"आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय" म्हणणाऱ्या Devendra Fadnavis यांना Sharad Pawar यांचा चिमटा, म्हणाले...

"आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय" म्हणणाऱ्या Devendra Fadnavis यांना Sharad Pawar यांचा चिमटा, म्हणाले...

"आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय" म्हणणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांनी काढला चिमटा, म्हणाले...

"आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय" म्हणणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांनी काढला चिमटा, म्हणाले...

Sharad Pawar reply on Devendra Fadnavis statement on CM post: राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन शरद पवारांनी त्यांना चिमटा काढला आहे.

    मुंबई, 13 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या "आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय" या वक्तव्यावर शरद पवारांनी भाष्य करत फडणवीसांना चिमटा काढला आहे. पाहूयात नेमकं काय म्हणाले आहेत. शरद पवार म्हणाले, काही आरोप झाल्यावर त्याचं स्पष्टीकरण भाजप द्यायला येतं, याचं महाल नवल वाटतं. ईडी, आयटी, एनसीबी सर्वांचाच गैरवापर होतोय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, या केंद्रीय तपास यंत्रणांचा मला अभिमान आहे. कालच्या भाषणात ते म्हणाले की मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत आहे. मी चार वेळा मुख्यमंत्री होतो पण ते लक्षात राहत नाही. त्यांना मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं मी त्यांचं अभिनंदन करतो असं म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना चिमटा काढला आहे. (Sharad Pawar reaction on Devendra Fadnavis statement 'I still feel I am CM') काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस म्हणाले, मंदा म्हात्रे, गणेश नाईक, नरेंद्र पाटील, रमेश पाटील तुमच्यासारखे नेते पाठीशी असल्याने मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाहीये. मला आजही मुख्यमंत्री असल्याचं वाटतंय. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचं नाही तो काय करतो हे महत्त्वाचं आहे. गेली 2 वर्षे एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेत आहे. त्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिले नाही की मी मुख्यमंत्री नाहीये. ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी पहिल्यांदा येथे गोवर्धनी मातेच्या दर्शनाला येणार. आपलं सरकार असताना अनेक योजना राबवल्या. नवी मुंबईत गणेश नाईक असोत किंवा आमच्या ताई असतील यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे या शहराचा विकास झाला आहे. देशातील सर्वात शहर असेल, वेगवेगळ्या स्पर्धा असतील हे शहर नेहमीच अग्रेसर राहिलं आहे. मला विश्वास आहे की, आगामी मनपा निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद पुन्हा मिळेल आणि नवी मुंबईची सेवा करण्यासाठी आमच्या नेत्यांची टीम पुन्हा आपल्या सेवेत येत्य काळात आपल्याला पहायला मिळेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतो. वाचा : "पाहुण्यांनी पाहुण्यांसारखं रहावं, अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये" शरद पवार शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यावर हल्ला झाला, 5 जवान शहीद झाले चीनसोबत 13 वेळा बैठक घेण्यात आल्या पण एकही बैठक यशस्वी झाली नाही सीमाप्रश्नी राजकारण न करता सर्वपक्षीयांनी भूमिका घेणं गरजेचं आहे केंद्र सरकार यंत्रणेंचा गैरवापर करत आहे केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय सीबीआय, ईडी, एनसीबी सारख्या तपासयंत्रणांचा वापर राजकीयदृष्टीने होत असल्याचं दिसतंय अनिल देशमुखांच्या विरोधात तत्कालीन मुंबई पोलीस कमिश्नर यांनी काही आरोप केले, त्यावर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला अनिल देशमुख यांच्यावर ज्यांनी आरोप केले त्यांचा आज पत्ता नाही अनिल देशमुख हे तातडीने बाजूला झाले आणि हे अधिकारी गायब झाले अनिल देशमुख यांच्या घरी 5 वेळा छापा टाकला 5-5 वेळेला एखाद्याच्या घरी छापा टाकण कितपत योग्य आहे याबाबत जनमत व्यक्त होणं गरजेचं आहे 5-5 वेळा छापा टाकून काय मिळालं अनिल देशमुखांवर आरोप करणारे आज कुठे आहेत? शरद वापारांचा सवाल लखीमपूरमध्ये शांतपणे रस्त्यावर चाललेल्या लोकांना चिरडले नागरिकांच्या अंगावर गाडी घालणं असा प्रकार आतापर्यंत कधी झाला नाही लखीमपूरमध्ये जे घडलं ते आतापर्यंत कधी घडलं नव्हतं केंद्रीय मंत्र्यांचे चिरंजीव गाडीत होते सुप्रीम कोर्टाच्या प्रतिक्रियेनंतर मंत्र्यांच्या मुलांना अटक करण्यात आलं लखीमपूरच्या प्रकारात शेतकऱ्यांच्या हत्येनंतर सत्ताधारी पक्षाने भूमिका घेणं अपेक्षित होतं बघ्याची भूमिका घेत, कारवाई न करणं या सर्वाला जबाबदार उत्तरप्रदेश सरकार आहे लखीमपूर घटनेवर उत्तरप्रदेश सरकारचं अद्याप मौन मावळमध्ये जे घडलं त्याला राजकीय नेते जबाबदार नव्हते मावळमधील घटनेमध्ये पोलिसांवर आरोप होता मावळ घटनेवरुन टीका करणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांचे उत्तर मावळमध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावलं मावळच्या लोकांना भडकवायला कुणी प्रयत्न केले हे लक्षात आल्यावर आता मावळमधील नागरिकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 90 हजार मतांनी विजयी केलं मावळच्या जनतेला भाजपची भूमिका कळल्यामुळेच तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकला काही लोकांना आणि पक्षांना बदनाम करण्याची जबाबदारी घेतली केंद्रीय यंत्रणांपेक्षा मुंबई पोलीस जास्त कार्यक्षम आहेत केंद्रीय यंत्रणांपेक्षा मुंबई पोलिसांनी जास्त ड्रग्ज जप्त केलं कुणी शंका घेऊ नये अशी कारवाई मुंबई पोलीस करतात कुठंही गुन्हा घडला तर पंचनामा करतात, पंचांच्या साह्या घेतल्या जातात, ती कारवाई योग्य आहे याची खातरजमा होण्यासाठी पंचांच्या साक्षीने केलं जातं हे कोण गोसावी होते, ते त्यांच्या character वरून integrity लक्षात येते. या अधिकाऱ्यांचं असोसिएशन कशा प्रकारच्या लोकांबरोबर आहे हे लक्षात येतं
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Maharashtra, Sharad pawar

    पुढील बातम्या