मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'.... म्हणून मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय' : देवेंद्र फडणवीस

'.... म्हणून मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय' : देवेंद्र फडणवीस

'.... म्हणून मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय' देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य (File Photo)

'.... म्हणून मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय' देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य (File Photo)

Devendra Fadnavis statement on CM post: मुख्यमंत्रिपदाबाबत राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केले आहे.

  • Published by:  Sunil Desale

नवी मुंबई, 12 ऑक्टोबर : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवी मुंबईतील बेलापूर (Belapur) येथे एक मोठं वक्तव्य केलं आहे. मी गेली दोन वर्ष इतके काम करतोय की मला जाणवले नाही की मी मुख्यमंत्री (Chief Minister) नाहीये. तुम्ही लोकांनीही मला जाणवू दिले नाही की मी मुख्यमंत्री नाहीये असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नवी मुंबईतील बेलापूर येथे मासळी विक्रेत्या महिलांना परवाना वाटपाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मंदा म्हात्रे, गणेश नाईक, नरेंद्र पाटील, रमेश पाटील तुमच्यासारखे नेते पाठीशी असल्याने मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाहीये. मला आजही मुख्यमंत्री असल्याचं वाटतंय. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचं नाही तो काय करतो हे महत्त्वाचं आहे. गेली 2 वर्षे एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेत आहे. त्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिले नाही की मी मुख्यमंत्री नाहीये. ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी पहिल्यांदा येथे गोवर्धनी मातेच्या दर्शनाला येणार.

वाचा : राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

आपलं सरकार असताना अनेक योजना राबवल्या. नवी मुंबईत गणेश नाईक असोत किंवा आमच्या ताई असतील यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे या शहराचा विकास झाला आहे. देशातील सर्वात शहर असेल, वेगवेगळ्या स्पर्धा असतील हे शहर नेहमीच अग्रेसर राहिलं आहे. मला विश्वास आहे की, आगामी मनपा निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद पुन्हा मिळेल आणि नवी मुंबईची सेवा करण्यासाठी आमच्या नेत्यांची टीम पुन्हा आपल्या सेवेत येत्य काळात आपल्याला पहायला मिळेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

लोकउपयोगी उपक्रम सातत्याने हातात घेण्याचं काम मंदाताई करत असतात. शेवटी आपण नेहमीच म्हणतो की आपल्या घरातील आई असते, सुन असते ती नेहमी घराची काळजी घेत असते. घरातील पुरुष ज्या गोष्टींचा विचार कधी करत नाहीत घरातील त्याही गोष्टींचा विचार स्त्री करत असते. हीच भूमिका मंदाताई यांच्यात दिसून येते. आज आमच्या कोळी भगिनींना नवीन मार्केट उपलब्ध तर करुन दिलंच त्यासोबतच नवीन परवानेही उपलब्ध करुन दिले आहेत. मला विश्वास आहे आमच्या या भगिनींचा आशीर्वाद मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Chief minister, Devendra Fadnavis