• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • "पाहुण्यांनी पाहुण्यांसारखं रहावं, अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये" आयकर विभागाच्या छापेमारीवर पवारांची प्रतिक्रिया

"पाहुण्यांनी पाहुण्यांसारखं रहावं, अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये" आयकर विभागाच्या छापेमारीवर पवारांची प्रतिक्रिया

"पाहुण्यांनी अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये" आयकर विभागाच्या छापेमारीवर पवारांची प्रतिक्रिया

"पाहुण्यांनी अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये" आयकर विभागाच्या छापेमारीवर पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar reaction on IT raid: आयकर विभागाकडून सुरू असलेल्या छापेमारीवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:
    मुंबई, 13 ऑक्टोबर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तींयांच्या साखर कारखान्यांवर तसेच अजित पवारांच्या बहिणींच्या घरावर आयकर विभागाकडून छापेमारी (Income Tax raid) करण्यात आली. गेल्या सहा दिवसांपासून आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू आहे. आयकर विभागाकडून सुरू असलेल्या या कारवाईवर शरद पवारांना विचारले असता त्यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. (Sharad Pawar reaction on Income Tax raid) अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये शरद पवारांनी म्हटलं, असे पाहुणे येतात... एक-दोन-तीन दिवस राहतात पण आजचा सहावा दिवस आहे. पाहुण्यांनी इतकं राहू नये. अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये. अजित पवारांच्या बहिणींच्या घरावर छापेमारी करण्यात आली त्या साखर कारखान्याशी संबंधित नाहीत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव ? आम्हाला जायचं आहे पण आम्हाला सूचना आहेत की, सांगितल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही असं आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटल्याचं शरद पवारांनी सांगितलं. शरद पवारांनी केलेल्या या विधानामुळे आता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाचा : बहिणीच्या घरी दुसऱ्या दिवशीही इन्कम टॅक्सची चौकशी सुरू, अजित पवार म्हणाले, "पाहुणे आलेत, ते गेल्यावर..." केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर शरद पवार यांनी म्हटलं, केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. सीबीआय, ईडी, एनसीबी सारख्या तपासयंत्रणांचा वापर राजकीयदृष्टीने होत असल्याचं दिसतंय. अनिल देशमुखांच्या विरोधात तत्कालीन मुंबई पोलीस कमिश्नर यांनी काही आरोप केले, त्यावर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला. अनिल देशमुख यांच्यावर ज्यांनी आरोप केले त्यांचा आज पत्ता नाही. अनिल देशमुख हे तातडीने बाजूला झाले आणि हे अधिकारी गायब झाले. अनिल देशमुख यांच्या घरी 5 वेळा छापा टाकला. 5-5 वेळेला एखाद्याच्या घरी छापा टाकण कितपत योग्य आहे याबाबत जनमत व्यक्त होणं गरजेचं आहे. 5-5 वेळा छापा टाकून काय मिळालं? अनिल देशमुखांवर आरोप करणारे आज कुठे आहेत? असे सवालही शरद वापारांनी उपस्थित केले. वाचा : "आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय" म्हणणाऱ्या Devendra Fadnavis यांना Sharad Pawar यांचा चिमटा, म्हणाले... शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यावर हल्ला झाला, 5 जवान शहीद झाले चीनसोबत 13 वेळा बैठक घेण्यात आल्या पण एकही बैठक यशस्वी झाली नाही सीमाप्रश्नी राजकारण न करता सर्वपक्षीयांनी भूमिका घेणं गरजेचं आहे केंद्र सरकार यंत्रणेंचा गैरवापर करत आहे केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय सीबीआय, ईडी, एनसीबी सारख्या तपासयंत्रणांचा वापर राजकीयदृष्टीने होत असल्याचं दिसतंय अनिल देशमुखांच्या विरोधात तत्कालीन मुंबई पोलीस कमिश्नर यांनी काही आरोप केले, त्यावर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला अनिल देशमुख यांच्यावर ज्यांनी आरोप केले त्यांचा आज पत्ता नाही अनिल देशमुख हे तातडीने बाजूला झाले आणि हे अधिकारी गायब झाले अनिल देशमुख यांच्या घरी 5 वेळा छापा टाकला 5-5 वेळेला एखाद्याच्या घरी छापा टाकण कितपत योग्य आहे याबाबत जनमत व्यक्त होणं गरजेचं आहे 5-5 वेळा छापा टाकून काय मिळालं अनिल देशमुखांवर आरोप करणारे आज कुठे आहेत? शरद वापारांचा सवाल लखीमपूरमध्ये शांतपणे रस्त्यावर चाललेल्या लोकांना चिरडले नागरिकांच्या अंगावर गाडी घालणं असा प्रकार आतापर्यंत कधी झाला नाही लखीमपूरमध्ये जे घडलं ते आतापर्यंत कधी घडलं नव्हतं केंद्रीय मंत्र्यांचे चिरंजीव गाडीत होते सुप्रीम कोर्टाच्या प्रतिक्रियेनंतर मंत्र्यांच्या मुलांना अटक करण्यात आलं लखीमपूरच्या प्रकारात शेतकऱ्यांच्या हत्येनंतर सत्ताधारी पक्षाने भूमिका घेणं अपेक्षित होतं बघ्याची भूमिका घेत, कारवाई न करणं या सर्वाला जबाबदार उत्तरप्रदेश सरकार आहे लखीमपूर घटनेवर उत्तरप्रदेश सरकारचं अद्याप मौन मावळमध्ये जे घडलं त्याला राजकीय नेते जबाबदार नव्हते मावळमधील घटनेमध्ये पोलिसांवर आरोप होता मावळ घटनेवरुन टीका करणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांचे उत्तर मावळमध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावलं मावळच्या लोकांना भडकवायला कुणी प्रयत्न केले हे लक्षात आल्यावर आता मावळमधील नागरिकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 90 हजार मतांनी विजयी केलं मावळच्या जनतेला भाजपची भूमिका कळल्यामुळेच तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकला काही लोकांना आणि पक्षांना बदनाम करण्याची जबाबदारी घेतली केंद्रीय यंत्रणांपेक्षा मुंबई पोलीस जास्त कार्यक्षम आहेत केंद्रीय यंत्रणांपेक्षा मुंबई पोलिसांनी जास्त ड्रग्ज जप्त केलं कुणी शंका घेऊ नये अशी कारवाई मुंबई पोलीस करतात कुठंही गुन्हा घडला तर पंचनामा करतात, पंचांच्या साह्या घेतल्या जातात, ती कारवाई योग्य आहे याची खातरजमा होण्यासाठी पंचांच्या साक्षीने केलं जातं हे कोण गोसावी होते, ते त्यांच्या character वरून integrity लक्षात येते. या अधिकाऱ्यांचं असोसिएशन कशा प्रकारच्या लोकांबरोबर आहे हे लक्षात येतं
    Published by:Sunil Desale
    First published: