वांद्रे गर्दी प्रकरणावरुन शरद पवारांनी टोचले भाजपचे कान, म्हणाले...

वांद्रे गर्दी प्रकरणावरुन शरद पवारांनी टोचले भाजपचे कान, म्हणाले...

वांद्रे इथं कुणी तरी रेल्वे सुरू झाल्याची अफवा पसरवली आणि त्यामुळे हजारो लोकं तिथे जमा झाले होते.

  • Share this:

मुंबई, 14 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. या मुद्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या काही सूचना केल्या आहे त्यांचं सर्वांनी पालन केलं पाहिजे, असं आवाहन केलं आहे. तसंच वांद्रे इथं जमलेल्या गर्दीवर त्यांनी परखड भाष्य केलं आहे.

'लॉकडाउनमुळे अनेक राज्यामध्ये सीमाबंद करण्यात आल्यामुळे वेगवेगळ्या राज्यातील मजूर अडकले आहे.  अनेक जण आपल्या गावाकडे जाण्यासाठी आग्रही आहे. साहजिकच सर्वांना घराकडे जाण्याची ओढ असेल. पण, राज्यावर आलेलं संकट पाहता त्यांना राज्याबाहेर जाण्याची परवानगी नाही. राज्यात अनेक ठिकाणी अडकलेल्या मजुरांसाठी अन्नदान दिलं जात आहे. राज्य सरकार आणि सामजिक संस्थांकडून मदत पुरवली जात आहे, त्यामुळे या संकटाच्या काळात सर्वांनी साथ देणे गरजेचं आहे', असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

हेही वाचा -नगरमधील अधिकाऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, जिल्हाबंदीच्या आदेशावरून आरोप

'वांद्रे इथं कुणी तरी रेल्वे सुरू झाल्याची अफवा पसरवली आणि त्यामुळे हजारो लोकं तिथे जमा झाले होते. प्रामुख्याने आपण डिस्टसिंगच्या सुचना केल्या आहे, त्याचं पालन केलं गेलं नाही. कुणीही अशा अफवा पसरवू नये, वांद्रे इथं जे घडलं ते पुन्हा घडू नये, याची खबरदारी घेतली पाहिजे', असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

'राजकारण करू नका'

'राजकीय संघर्ष हा आपण नेहमी करत असतो. त्यात आपण काही वेगळं करत नाही. पण, देशावर सध्या मोठं संकट आलं आहे. म्हणून केंद्रात कुणाचे सरकार आहे, राज्यात कुणाचे सरकार आहे याचा विचार करण्यापेक्षा एकत्र राहून मदत करणे गरजेचं आहे. राज्याला येणाऱ्या काळात काही अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. या काळात सर्वच जण एकत्र येऊन मदत करणे अपेक्षित आहे. पण, अशा परिस्थितीत राजकारण कुणीही करू नये, असं सांगत त्यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला.

मोदींची भूमिका योग्यच

पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशाला संबोधित भाषण केलं. यावेळी त्यांनी दिलेल्या सूचनाला पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे. त्यांनी सर्व मुख्यमंत्री, पक्षातील नेत्यांसोबत चर्चा केली. कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. त्याचा सर्वांनी स्वीकार केला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.

उद्धव ठाकरेंच्या कामाचे कौतुक

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी हे उत्तम प्रकारे जनतेशी संवाद साधत आहे. त्यांनी उत्तम प्रमाणे जनतेला धीर देत आहे. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन संपला होता. त्यानंतर तो पुढे 3 मेपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याला सर्वच राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सहकार्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या 3 मेपर्यंत लॉकडाउनचा कार्यक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे, असंही पवार म्हणाले.

हेही वाचा -लॉकडाऊनसाठी नवी नियमावली जाहीर; 'या' सेवांना दिल्या सवलती, तर ट्रेन बंदच राहणार

'डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा'

कोरोनामुळे आलेल्या संकटामुळे जगभरात चर्चा सुरू आहे. कोरोनाचा सामना हा धीराने केला पाहिजे, यासाठी योग्य नियोजन करण्याचे गरजे आहे. जागतिक पातळीवर उपाययोजना राबवल्या जात आहे. भारतात केंद्रातील, राज्यातील शासकीय डॉक्टर, आरोग्य कर्मचारी सगळे कोरोनाला पराभूत करण्यासाठी लढा देत आहे, त्यांना आपण पाठबळ दिले पाहिजे, असंही पवार म्हणाले.

बँकांकडून नियम शिथील व्हावे

आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्या निश्चितपणे वेळ लागणार आहे. केंद्राने अनेक निर्णय घेतले आहे ते चांगले आहे. पण, आरबीआयने काही सूचना दिल्या आहे. राज्य सरकारने जे बँकाकडून कर्ज घेतले आहे, त्याबद्दल अटी शिथील केल्या पाहिजे, अशी मागणीही  पवारांनी केली.

 

संपादन - सचिन साळवे

First published: April 15, 2020, 12:26 PM IST

ताज्या बातम्या