विनय म्हात्रे, नवी मुंबई 11 सप्टेंबर : नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचं अखेर विसर्जन झालंय अशी स्थिती आहे. पक्षाचे मातब्बर नेते गणेश नाईकांनी आज भाजपचा झेंडा हाती घेतलाय. नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 48 नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय. यामुळे नवी मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकलाय. काही दिवसांपूर्वीच त्यांचे पुत्र संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता जिल्ह्यातील नेते, नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्यांसह गणेश नाईकांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला प्रचंड मोठं खिंडार पडलंय. गेली अनेक दशकं नवी मुंबईवर गणेश नाईकांच एकछत्री वर्चस्व होतं. त्यामुळे तिथे भाजपचा जोर वाढणार आहे. नवी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गणेश नाईक हे भाजपवासी झाले. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतं ‘वंचित’ला मिळालीच नाहीत - प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले, नवी मुंबई जिल्ह्यातून कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा प्रवेश झाला. गणेश नाईकांवर आमचा डोळा अनेक दिवसांपासून होता. काहीवेळा उशीर होतो पण आज तो दिवस आज उजाडला. पंतप्रधानांचे उत्तम नेतृत्व पाहूनच देशातील कर्तृत्वान नेते भाजप मध्ये येत आहे. नवी मुंबई आणि पनवेल या दोन्ही महापालिका या विभागाचा उत्तम विकास करतील. गणेश नाईकांच्या नेतृत्वाने नगर विकास विभाग नवी मुंबईचे एकही प्रश्न बाकी ठेवणार नाही. नाईकांच्या प्रवेशामुळे भाजपला मोठं पाठबळ मिळालंय. नाईकांमागे मोठ्या प्रमाणात लोकं उभी आहेत. त्यांना पाठिंबा आहे. हा पाठिंबा भाजप मागे येणार आहे. येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात झालेल्या कामानंतर मात्र देशातील कोणताच राज्य स्पर्धेमध्ये राहणार नाही. अजित पवारांचा पलटवार, किंमत मोजावी लागली तरी चालेल पण दिलेला शब्द पाळतो! हर्षवर्धन पाटीलही भाजपमध्ये काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटीलांनी अखेर भाजपचं कमळ हाती घेतलंय.बुधवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. खरं तर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. भाजपात दाखल होताचं त्यांनी नाव न घेता अजित पवारांवर ही खोचक टीका केलीय. हर्षवर्धन पाटील अखेर भाजपमध्ये डेरेदाखल होताच मुख्यमंत्र्यांकडून त्यांना इंदापूरची उमेदवारीही जाहीर करण्यात आलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.