अमरावती, राजेंद्र शेंडे 11 सप्टेंबर : लोकसभा निवडणुकीत सोशल इंजिनिअरिंगचा नारा देत राजकारणात नवं पर्व सुरू करण्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली हेती. MIMसोबत युती करून दलित मुस्लिम ऐक्याची हाक त्यांनी दिली होती. लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’बहुजन आघाडीचा फटकाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसल्याचं स्पष्ट झालं. आता लोकसभा निवडणुकीनंतर चार महिन्यांनी प्रकाश आंबेडकर आणि MIM यांची फारकत झाली. लोकसभा निवडणुकीत आम्हाला मुस्लिम मतं मिळालीच नाहीत असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे MIM सोडून गेल्याने फारसं नुकसान होणार नाही असंही ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, MIM सोबत युती तुटली तरी त्याचा वंचित आघाडीवर परिणाम होणार नाही. जागावाटपावर पेच असतानाच उद्धव ठाकरेंनी केलं ‘युती’वर मोठं विधान गेल्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने वंचित आघाडीला मतदान केलं नव्हतं असं सांगत एमआयएम सोबत युती तुटल्याची थेट कबुली दिली. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून तो एमआयएमलासुद्धा आहे असे सांगत एमआयएम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत असंही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर मुस्लिम समाजाचा आत्मविश्वास वाढल्याने तो समाज आमच्या सोबत आहे असंही त्यांनी सांगितलं. पंकजा मुंडेंकडे आठशे कोटींचा दारुचा कारखाना, धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप विधानसभेच्या 25 जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवार देणार अशी घोषणाही त्यांनी केली. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे मातंग समाजाच्या वतीने सत्तासंपादन व प्रबोधन मेळाव्यासाठी ते आले होते. विरोधी पक्षातील नेते वंचित आघाडी सत्तेवर येणार या भीतीने भाजपात प्रवेश करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ‘युती’ची घोषणा लवकरच भाजप आणि शिवसेनेच जागावाटपावरून काही अडचणी असल्या तरी चर्चेच्या माध्यमातून त्या सोडवण्यात येतील. आठवडाभरात युतीची घोषणा होईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय. जागावाटप ही जरा किचकट प्रक्रिया असते. दोनही पक्षांमध्ये अनेक नवे लोक येत आहेत. आमची ताकद वाढत आहे. त्यामुळे काही जागांबाबतही फेरविचार करावा लागतो. त्यामुळे थोडा वेळ लागतोय. युतीत अभेद्य असून आम्ही ऐतिहासिक विजय मिळवू अशी आशाही मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. मुनगंटीवार हे सहकुटुंब लालबागच्या दर्शनाला आले होते. त्यांनंतर त्यांनी ‘न्यूज18 लोकमत’ला ही माहिती दिली. भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू असून भाजपला थोड्या जास्त जागा पाहिजे आहेत. तर शिवसेना 50 टक्के फॉर्म्युल्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







