अजित पवारांचा पलटवार, किंमत मोजावी लागली तरी चालेल पण दिलेला शब्द पाळतो!

' पुण्यात झालेल्या बैठकीत इंदापूरबाबत मी शब्द दिला होता. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जो निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल असं मी सांगितलं होतं.'

News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2019 05:27 PM IST

अजित पवारांचा पलटवार, किंमत मोजावी लागली तरी चालेल पण दिलेला शब्द पाळतो!

जितेंद्र जाधव, बारामती 11 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. 4 सप्टेबरला इंदापूरमध्ये केलेल्या मेळाव्यात पाटील यांनी पवारांवर दगाबाजी, धोकेबाजी आणि शब्द फिरवल्याचा आरोप केला होता. त्याला अजित पवारांनी आज बारामतीत उत्तर दिलंय. ते म्हणाले, अजित पवार एकदा दिलेला शब्द कधीही पाळतो. मग त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल असं सांगून पाटील हे खोटे आरोप करीत असल्याचं पवार यांनी सांगितलंय. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असा शब्द पाटील यांना दिला होता असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले, सांगायला काही नाही म्हणून सर्व काही राष्ट्रवादीने केलं असा आरोप हर्षवर्धन पाटील करीत आहेत. पुण्यात झालेल्या बैठकीत इंदापूरबाबत मी शब्द दिला होता. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जो निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल असं मी सांगितलं होतं. मात्र राष्ट्रवादीविरुद्ध वातावरण तयार केलं जातंय असा आरोप त्यांनी केला. हर्षवर्धन पाटील यांच्याशी आपला कुठलाही वयक्तिक वाद नाही असंही ते म्हणाले.

वाचा: पंकजा मुंडेंकडे आठशे कोटींचा दारुचा कारखाना, धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

काय म्हणाले होते हर्षवर्धन पाटील?

हर्षवर्धन पाटील यांनी 4 सप्टेंबरला झालेल्या इंदापूरातल्या मेळाव्यात एकदाचे आपल्या मनात वर्षानुवर्षे साचलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. यांनी त्यांचा भाजपकडे जायचा कल आहे हे सूचकपणे सांगितले आणि जनसंकल्प मेळाव्याला उपस्थित इंदापूरकरांनीही भाजप, भाजप, कमळ, कमळ म्हणत तोच कौल दिला. अर्थात 10 सप्टेंबरच्या आसपास आपण काँग्रेस सोडून कुठं जाणार याचा अंतिम निर्णय घेऊ म्हणत त्यांनी थोडी संदिग्धता ठेवलीय.

Loading...

आपले चुलते बाजीराव पाटील यांना लोकसभेचे तिकीट नाकारून अजित पवारांना दिले. तेव्हापासून आपण प्रामाणिकपणे बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार मग ते शरद पवार असो वा सुप्रिया सुळे यांची प्रामाणिकपणे कामं केलीत, आघाडीचा धर्म पाळला. बदल्यात मात्र आपल्यावर अन्याय झाला, अपमान वाट्याला आला, राजकीय कोंडी केली गेली आणि राष्ट्रवादीने सगळा विचका केला म्हणत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे या तिघांवर दगाबाजी, विश्वासघात केल्याचे आरोप केले.

वाचा: फक्त राष्ट्रवादी नाही शिवसेनेलाही धक्का देणार नाईक, 70 जणांचा भाजप प्रवेश होणार

कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा विरोध असतानाही आपण  सुप्रिया सुळेंना इंदापुरातून 72 हजार मतांचे लीड मिळवून दिले मात्र शिवस्वराज्य यात्रा मुद्दाम इंदापुरात काढून, दत्तात्रय भरणे या विद्यमान आमदारालाच तिकीट दिलं जाईल असे संकेत देत जखमेवर मीठ चोळले गेले अशी  व्यथा त्यांनी मांडली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 05:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...