Home /News /mumbai /

'5 मिनिटांपूर्वी बंडखोर आमदारांसोबत बोलणं झालं; मविआ सरकार आहे आणि राहाणार', राऊतांचा दावा

'5 मिनिटांपूर्वी बंडखोर आमदारांसोबत बोलणं झालं; मविआ सरकार आहे आणि राहाणार', राऊतांचा दावा

संजय राऊत म्हणाले, गुवाहाटीमधील काही आमदारांसोबत आत्ताच माझं बोलणं झालं आहे. त्यांची परत शिवसेनेसोबत येण्याची इच्छा आहे. ज्यांना परत यायचं आहे, त्यांच्यासाठी आमची दारं, खिडक्या सगळं खुलं आहे.

    मुंबई 26 जून : शिवसेनेचे चाळीसच्या आसपास आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले आहेत. यानंतर राज्यात राजकीय भूकंप आलेला आहे. महाविकास आघाडी सरकार धोक्यात आहे आणि हे सरकार वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न सुरू आहेत. आमदारांच्या बंडावर आता पुन्हा संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बंडखोर आमदारांमधील अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलं आहे. 'आना ही पडेंगा चौपाटी में...' संजय राऊतांचा आठवले स्टाईल शिंदे गटाला खोचक टोला संजय राऊत म्हणाले, गुवाहाटीमधील काही आमदारांसोबत आत्ताच माझं बोलणं झालं आहे. त्यांची परत शिवसेनेसोबत येण्याची इच्छा आहे. ज्यांना परत यायचं आहे, त्यांच्यासाठी आमची दारं, खिडक्या सगळं खुलं आहे. गुवाहाटीमध्ये काय आहे? मुंबईत या...इथे पार्टी करा, असं आवाहन संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केलं आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, आसाममध्ये पूर आलेला आहे आणि हे लोक हॉटेललमध्ये पार्टी करत आहेत. भाजप हे सगळं करत आहे. धमक असेल तर निवडणूक लढा, असा आव्हान संजय राऊत यांनी बंडखोरांना केलं आहे. पुढे राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले तर सांगा. 2019 मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवायचा होता, त्याला भाजपने विरोधा केला. आजही आमच्या लोकांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असंही ते म्हणाले. एकनाथ शिंदे घेणार राजभवनाकडे धाव, राज्यपालांकडे निघणार का वादावर तोडगा? गुवाहाटीमधील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना राऊत म्हणाले, की तिथे एकमेकांवर हल्ले झाले किंवा एकमेकांचे कपडे फाडले, तरी काहीही आश्चर्य वाटणार नाही. कारण आमदारांना जबरदस्ती डांबूल ठेवलं गेलं आहे. माझं काही आमदारांसोबत बोलणं झालं आहे, त्यांना परत यायचं आहे. यासोबतच राऊत यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केलं की हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. राऊत म्हणाले की बंडखोरांचे बाप अनेक आहेत, आमचा बाप फक्त बाळासाहेब ठाकरे आहेत. महाविकास आघाडी सरकार आहे आणि राहणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्ती केला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Sanjay raut

    पुढील बातम्या