जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / विक्रम गोखले कोण? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची शिवसेनेला गरज नाही : संजय राऊत

विक्रम गोखले कोण? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची शिवसेनेला गरज नाही : संजय राऊत

विक्रम गोखले कोण? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची शिवसेनेला गरज नाही : संजय राऊत

विक्रम गोखले कोण? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची शिवसेनेला गरज नाही : संजय राऊत

Sanjay Raut on Vikram Gokhale: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधत आपल्याला त्यांच्या मध्यस्थीची गरज नाही असं म्हटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 नोव्हेंबर : अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी तीन दिवसांपूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात देशाचं राजकरण तसंच सध्याच महाराष्ट्रातील राजकारण यावर भाष्य केलं होतं. तसेच शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) युती तुटणं ही चूक असल्याचं म्हटलं होतं. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut reaction on Vikram Gokhale statement on Shiv Sena- BJP yuti) शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, बाळासाहेबांनी स्वाभिमानाने जगायला शिकवलं. हिंदुत्व आणि मराठी विचार रूजवला. संकट आले की बाळासाहेब हवे होते, याची आठवण येते. उद्धव ठाकरे सामान्य माणसांप्रमाणे जगतात. तोऱ्यात वागत नाहीत. हे मोठे यश आहे. विक्रम गोखले कोण ? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान केला. अशा व्यक्तीच्या मध्यस्थीची गरज नाही. अशी व्यक्ती सेनेच्या आसपास फिरकू नये. मुख्यमंत्र्यांनी नकली हिंदुत्वाचा धोका देशाला आहे असं म्हटल होते. तेच नकली हिंदुत्व सध्या पहायला मिळतंय असंही संजय राऊत म्हणाले. वाचा :  विक्रम गोखले वडिलांच्या स्थानी असून विचार करूनच बोलले असतील, अवधुत गुप्तेनं केलं समर्थन युतीवर काय म्हणाले होते विक्रम गोखले ? भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही नव्हतो आणि नसेन. सेना-भाजपने मुख्यमंत्रिपद अडिच वर्षांसाठी वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं. होय, सेना भाजपची युती तुटणं ही चूकच आहे, हे स्वत: फडणवीसांनी मान्य केलंय माझ्याशी बोलताना त्यांनीही हे कबुल केलंय असं वक्तव्य विक्रम गोखले यांनी केलं होतं. राज्यात सेना भाजपची युतीचं सरकार येण्यासाठी मी स्वत: उद्धवजींशी बोलेन अस देखील ते यावेळी म्हणाले. तसेच राज्यात महाविकास अघाडीचे सरकार स्थापन होणं हा जनाधाराचा अवमान आहे.आताची सेना ही बाळासाहेबांची नाहीच. हे… आमच्यासारखे लोक सेनेच्या बोटचेप्या भूमिकेमुळे नाराज असल्याचे देखील विक्रम गोखले यांनी म्हटलं होतं. कंगनाच्या विधानाचे समर्थन बॉलिवू़ड अभिनेत्री कंगनाने देशाच्या स्वातंत्र्यवरून केलेल्या विधानाला देखील विक्रम गोखले यांनी पाठिंबा दर्शवला होता. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विक्रम गोखले म्हणाले होते की, होय, कंगना रणावतच्या विधानाशी मी सहमत आहे, त्यावेळी देशासाठी फासावर जाऊ दिलं गेलं, त्यांना वाचवता आलं असतं पण त्यावेळी राजकारणात वाचवलं गेलं नाही, असं म्हणत अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलं होत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात