मुंबई, 16 नोव्हेंबर : भारताला स्वातंत्र्य भीकमध्ये मिळाले असं वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतमुळे (Kangana Ranaut) तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (vikram gokhale) यांनीही तिच्या विधानाचं समर्थन केलं. आता गायक अवधुत गुप्तेनं (avadhoot gupte) सुद्धा विक्रम गोखले वडिलांच्या स्थानी असल्याचं सांगत समर्थन केलं आहे.
कंगना रनौतच्या विधानाचे समर्थन केल्यामुळे विक्रम गोखले यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. पत्रकारांनी अवधुत गुप्तेला याच मुद्यावर प्रश्न विचारला असता अवधुतने वेगळाच सूर लगावला.
विक्रम गोखले मोठे कलाकार असून वडिलांच्या स्थानी, अवधूत गुप्तेची प्रतिक्रिया pic.twitter.com/3fggYRD1p4
— News18Lokmat (@News18lokmat) November 16, 2021
'माझा राजकारणाची संबंध नाही. इतक्यात काही बोलणार नाही. पण विक्रम गोखले हे मोठे कलाकार आहे, आमच्या वडिलांच्या स्थानी आहे आम्ही त्यांचा खूप आदर करतो. त्यामुळे त्यांनी विचारपूर्वकच काही बोललं असेल. पण त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्याइतका मी पात्र नाही.
Online सेलमध्ये खरंच कमी किमतीत वस्तू मिळतात का? हे आहे डिस्काउंटचं गणित
तसंच, 'कंगनाने भारताला स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, 2014 ला खरे स्वातंत्र मिळाले याबद्दल तुमची काय भूमिका आहे असं पत्रकारांनी विचारले असता, अवधुत गुप्ते म्हणाला की, विक्रम गोखले हे आमच्या वडिलांच्या स्थानी आहे, ते अतिशय मोठे विचारवंत आहे. त्यांच्या अभ्यास खूप मोठा आहे. त्यांना कलाकार म्हणून मर्यादा नाहीये, त्यांनी जे मत व्यक्त केले ते काही विचाराअंती असावे' असं गुप्ते म्हणाला.
काय म्हणाले होते विक्रम गोखले?
विक्रम गोखले यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने काल, पुण्यात सन्मान सोहळा आयोजित करणात आला होता. यावेळी अभिनेते विक्रम गोखले यांनी देशाचं राजकरण तसंच सध्याच महाराष्ट्रातील राजकारण यावर भाष्य केलं. त्याचप्रमाणे त्यांनी यावेळी बॉलिवू़ड अभिनेत्री कंगना रणावतने देशाच्या स्वातंत्र्यवरून केलेल्या विधानाला देखील पाठींबा दर्शवला.
कमी पैशातही लग्नाचा धुमधडाका आहे शक्य; लोकही होतील खूश!
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विक्रम गोखले म्हणाले होते की, होय, कंगना रणावतच्या विधानाशी मी सहमत आहे, त्यावेळी देशासाठी फासावर जाऊ दिलं गेलं, त्यांना वाचवता आलं असतं पण त्यावेळी राजकारणात वाचवलं गेलं नाही, असं म्हणत अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलं होत. यावरून अनेक उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.