पुणे, 14 नोव्हेंबर: अभिनेते विक्रम गोखले (vikram gokhale) यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करणात आला आहे. पुण्यातील दुधाणे लॉन्स परिसरात हा सन्मान सोहळा सुरू आहे. यावेळी अभिनेते विक्रम गोखले यांनी देशाचं राजकरण तसंच सध्याच महाराष्ट्रातील राजकारण यावर भाष्य केलं. त्याचप्रमाणे त्यांनी यावेळी बॉलिवू़ड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) देशाच्या स्वातंत्र्यवरून केलेल्या विधानाला देखील पाठींबा दर्शवला. यासोबतच त्यांनी देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामचं देखील कौतुक केलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विक्रम गोखले म्हणाले की, होय, कंगना रणौतच्या विधानाशी मी सहमत आहे, त्यावेळी देशासाठी फासावर जाऊ दिलं गेलं, त्यांना वाचवता आलं असतं पण त्यावेळी राजकारणात वाचवलं गेलं नाही, असं म्हणत अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलं. तसेच ते पुढे म्हणाले की, माझ्या दृष्टीने बाबासाहेब या देशाला कळले नाही, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंतच्या देशातील सर्व पंतप्रधानांना शंभराच्या खाली मी गुण देतो. लाल बहादूर शास्त्री यांची जयंती ही 2 ऑक्टोबर ला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. वाचा : बॉयकॉट आणि अटकेच्या चर्चेत बिनधास्तपणे पार्टीत डान्स करताना दिसली कंगना जे 70 वर्षात झालं नाही ते मोदींनी केलं हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे. जे 70 वर्षात झालं नाही ते मोदींनी केलं, पक्षाचे काम सर्व करतात, पण ते देशासाठी मोदी चांगलं काम करतात. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल.राजकीय वर्तुळात परिस्थिती गंभीर झालेली आहे, कोणाची नावं घेत नाही.ब्राह्मण समाजवरती टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्रह्मणांमध्ये मतभेद निर्माण करणे काय चाललंय हे? कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही. देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो तो आणि छापला जातो हे दुर्देव आहे. त्यापूर्वी कोणी नव्हते का? मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही नव्हतो आणि नसेन. या देशाकरिता झटणारा हा माझा मुसलमान आहे, त्यात मी भेदाभेद करत नाही. सेना भाजपची युती तुटणं ही चूक भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही नव्हतो आणि नसेन, असे देखील विक्रम गोखले यांनी यावेळी सांगितलं. सेना-भाजपने मुख्यमंञीपद अडिच वर्षांसाठी वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं. होय, सेना भाजपची युती तुटणं ही चूकच आहे, हे स्वत: फडणवीसांनी मान्य केलंय माझ्याशी बोलताना त्यांनीही हे कबुल केलंय. वाचा : Shilpa Shetty आणि Raj Kundra ने मिळून केली फसवणूक, गुन्हा दाखल राज्यात सेना भाजपची युतीचं सरकार येण्यासाठी मी स्वत: उद्धवजींशी बोलेन राज्यात सेना भाजपची युतीचं सरकार येण्यासाठी मी स्वत: उद्धवजींशी बोलेन अस देखील ते यावेळी म्हणाले. तसेच राज्यात महाविकास अघाडीचे सरकार स्थापन होणं हा जनाधाराचा अवमान आहे.आताची सेना ही बाळासाहेबांची नाहीच. हे… आमच्यासारखे लोक सेनेच्या बोटचेप्या भूमिकेमुळे नाराज असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं. कंगना नेमकी काय म्हणाली होती भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014मध्ये मिळाले, असं कंगना रणावत म्हणाली होती. त्यानंतर देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या व वादंग निर्माण झाला. आता कंगनाच्या या वक्तव्याचं विक्रम गोखले यांनी समर्थन केल्याने, नव्या वादाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.