मुंबई, 24 मार्च : मुंबईत कारमध्ये स्फोट सापडल्या प्रकरणी अटकेत असलेले सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होते आहे. सचिन वाझेंकडे बनावट आधारकार्ड (Fake Aadhaar card) सापडले होते त्यानंतर आता त्यांनी 100 दिवसांसाठी 5 हॉटेल्समध्ये रूम बूक केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, या रूमचे पैसे हे एका ज्वेलर्सने दिले होते.
सचिन वाझे हे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएच्या ताब्यात आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सचिन वाझे हा मुंबईतील ट्रायडेन्ट या पंचतारांकीत हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता सचिन वाझे यांनी 100 दिवसांकरता 5 स्टार हॉटेलमध्ये रुम्स बूक केले होते. या रुमचे पैसे एक ज्वेलर्स व्यापारी देत होता. मिळालेल्या माहितीनुसार, झवेरी बाजारमधील हा मोठा ज्वेलर्स व्यापारी आहे. 100 दिवसांचं भाडं म्हणून या ज्वेलर्सने 25 लाख रुपये हॉटेलमध्ये भरले होते, अशी माहिती आता समोर आली आहे.
वांद्र्यातील ड्रग पुरवठा करणाऱ्याला NCBकडून अटक, चौकशीत अनेक कलाकारांची नावं उघड
विशेष म्हणजे, या ज्वेलर्सवर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या ज्वेलर्सने बॅंकेला कोट्यवधींचा चूना लावला होता. त्यामुळे फसवणुकीच्या प्रकरणात सापडलेल्या या ज्वेलर्सने कुणाच्या सांगण्यावरून वाझेंना मदत केली होती, या व्यक्तीचा NIA शोध घेत आहे.
सचिन वाझेंकडून बनावट आधार कार्ड जप्त
तर दुसरीकडे सचिन वाझे हॉटेल ट्रायडेंटमध्ये मुक्कामी होते. त्यावेळी त्यांनी खोटं आधारकार्ड देवून राहत असल्याची माहिती समोर आली आहे. सुशांत सदाशिव खामकर या नावाने बोगस आधारकार्ड जप्त करण्यात आले आहे. हॉटेल ट्रायडेंटमध्ये वाझे यांनी अनेक जणांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. बुकी नरेश गोर पण याच ठिकाणी वाझेंना भेटला होता.
एका मंत्र्याचे घेतलं वाझेंनी नाव!
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांनी NIA चौकशीत धक्कादायक गौप्यस्फोट केला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावून मला पैसे वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं, असं सचिन वाझे यांनी मान्य केलं आहे.
सचिन वाझे यांनी या चौकशीत आणखी एका मंत्र्याचं नाव घेतलं आहे आणि त्यांनी आपल्याला मागील वर्षी पैसे वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा दावा केला आहे. त्यामुळे सचिन वाझे याच्या दाव्यानुसार, पैसे वसुलीचं टार्गेट देणारा दुसरा नेता कोण, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, Fake, Identity verification, Mumbai ATS, Nia, Sachin vaze, मुंबई पोलीस