जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / धनंजय मुंडे प्रकरणाची पुन्हा चर्चा; भाजप नेत्याचा शरद पवारांना खडा सवाल

धनंजय मुंडे प्रकरणाची पुन्हा चर्चा; भाजप नेत्याचा शरद पवारांना खडा सवाल

धनंजय मुंडे प्रकरणाची पुन्हा चर्चा; भाजप नेत्याचा शरद पवारांना खडा सवाल

‘पवार नेकीने वागतात, मग धनंजय मुंडे प्रकरणात गप्प का?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 फेब्रुवारी : उदयनराजेंनंतर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. उदयनराजे यांनी मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची भेट घेतली होती. यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी धनंजय मुडें प्रकरणी शरद पवारांना खडा सवाल केला आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या लग्नाबाह्य संबंधांची कबुली दिली आहे. याशिवाय त्यांनी करुणा शर्माच्या मुलांना डांबुन ठेवल्याचाही आरोप आहे, इतक्या प्रकरणानंतरही पवार गप्प का? पवार नेकीने वागणारे असतानाही ते गप्प का? एक जण बंगल्यावर नेऊन मारतो, दुसरा पोलिसांना मारतो, तिसरा बलात्कार करतो…हे सरकार जनतेने निवडून दिलं नाही, म्हणून उत्तरदायी नाही असं महाविकास आघाडी सरकार वागत आहे. हे ही वाचा- एल्गार परिषद चालते, शिवजयंतीला विरोध का?’ राम कदम यांचा शिवसेनेवर घणाघात दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी नवी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)  यांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांची भेट घेतली. उदयनराजे यांनी शरद पवारांना मराठा आरक्षणासंदर्भात पत्र लिहिलं आहे. त्यात उदयनराजे यांनी लिहिलं आहे की, हे ही वाचा- राज्यपालांना विमानातून का उतरावे लागले? समोर आली महत्त्वाची माहिती ‘आदरणीय साहेब, तुम्हाला माहितच आहे की, मराठा समाज हा आरक्षणासाठी वर्षानुवर्षे खूप मोठा संघर्ष करत आहे. तरीही त्याच्या पदरात आजपर्यंत काहीच पडले नाही. यापेक्षा मला खूप दुःख होतं की मराठा समाजातल्या 40 हून अधिक मराठा बांधवानी आत्महत्या केली. मराठा समाजाची आरक्षणाची वैध मागणी लक्षात घेऊन राज्य शासनाने न्या. गायकवाड आयोगाची स्थापना केली. या आयोगाने खेडोपाडी, शहरांमधून मराठा समाजाच्या संबंधित जास्तीत जास्त आणि पुरावे जमा केले. तसेच अतिशय शास्त्रशुद्ध माहिती जमा केली. ही माहिती संकलित करून त्याची अहवाल राज्य शासनाला दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात