मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

VIDEO : 'एल्गार परिषद चालते, शिवजयंतीला विरोध का?' राम कदम यांचा शिवसेनेवर घणाघात

VIDEO : 'एल्गार परिषद चालते, शिवजयंतीला विरोध का?' राम कदम यांचा शिवसेनेवर घणाघात

तुगलकी फर्मान मागे घ्या, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.

तुगलकी फर्मान मागे घ्या, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.

तुगलकी फर्मान मागे घ्या, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 11 फेब्रुवारी : शिवजयंतीच्या मुद्द्यावरुन सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे. दरम्यान भाजप नेते राम कदम यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर घणाघाती टीका केली आहे. ज्यांच्या नावाने पक्ष चालवला आणि राज्यात सत्ता स्थापन केली, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला शिवसेनेकडून विरोध केला जात आहे. यादिवशी शिवसेना सरकारने एक तुगलकी फर्मान काढलं आहे. (why oppose Shiv Jayanti Ram Kadams attack on ShivSena)

यानुसार शिवजयंतीत 10 हून अधिक जणांना सामील होऊ नये, 11 वा व्यक्ती समाविष्ट झाला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं सांगितलं आहे. शिवसेना सरकारने हा फर्मान मागे घ्यावं.

हे ही वाचा-राज्यपालांना राज्य सरकारकडून विमानाच उपलब्ध झाले नाही, नवा वाद पेटण्याची चिन्ह

महाराष्ट्रात सातत्याने हिंदूंचा अपमान होत आहे. तुम्ही एल्गार परिषदेला परवानगी देता, रेल्वे-बसमधील गर्दी चालते, शेतकरी मोर्चाला परवानगी देता. मात्र शिवजयंतीला परवानगी नाही? हे कुठले तुमचे तुगलकी निर्णय? आम्ही राज्यात थाटामाटात शिवजयंती साजरी करू, तुमचा निर्णय मागे घ्या, अशी घणाघात राम कदम यांनी राज्य सरकारवर केला.

दरम्यान राज्यात पुढील काळामध्ये दोन उपमुख्यमंत्री आणि काही खात्यांमध्ये अदलाबदल होणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. पण, महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अशी कोणतीही चर्चा नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी स्पष्ट केलं. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार होता. ( why oppose Shiv Jayanti Ram Kadams attack on ShivSena) त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी सरकारमधील खातेवाटपाचा प्रश्न विचारला असता या बातम्या मीडियातील आहेत, तुमचे सोर्स नेमके काय हे मला काही माहिती नाही, असा खुमसदार टोलाही अजितदादांनी लगावला.

First published:

Tags: BJP, Ram kadam, Shivjayanti, Shivsena