मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्यपालांना विमानातून का उतरावे लागले? समोर आली महत्त्वाची माहिती

राज्यपालांना विमानातून का उतरावे लागले? समोर आली महत्त्वाची माहिती

विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्यामुळे राज्यपालांना खाली उतरावे लागले. त्यामुळे भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे.

विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्यामुळे राज्यपालांना खाली उतरावे लागले. त्यामुळे भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे.

विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्यामुळे राज्यपालांना खाली उतरावे लागले. त्यामुळे भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे.

मुंबई, 11 फेब्रुवारी :  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor  bhagat singh koshyari) आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Goverment) या ना त्या मुद्यावरून नेहमी वाद पाहण्यास मिळाला. आज तर विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्यामुळे राज्यपालांना खाली उतरावे लागले. त्यामुळे भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये टीका टिप्पणी सुरू झाली आहे. पण मंत्रालयात संबंधित विभागाच्या विसंवादामुळे हे नाट्य घडल्याचे समोर आले आहे.

आज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. राज्य सरकारच्या विमानात राज्यपाल विराजमान सुद्धा झाले. पण, विमानाला उड्डाण करण्यास मंत्रालयाकडून परवानगी नसल्याचे समोर आले. त्यामुळे राज्यपाल विमानातून खाली उतरले आणि प्रवासी विमानाने नियोजित दौऱ्यासाठी उत्तराखंडला रवाना झाले.

राज्यपालांना विमानातून का उतरावे लागले?

त्याचं झालं असं की, मुख्यमंत्री कार्यालयाकडून बुधवारी रात्री  उशीरापर्यंत राज्यपाल कोश्यारी यांना उत्तराखंड इथं जाणाऱ्या विमानाला उड्डाण करण्यास परवानगी दिली गेली नव्हती. त्यानंतर सकाळी ही राजभवनाकडून यासंदर्भात चौकशी करूनच राज्यपाल यांनी विमानतळाकडे जाणे अपेक्षित होते. पण झाले उलटेच.

विशेष म्हणजे,  महाराष्ट्र शासनाच्या विमान परवानगी देणाऱ्या विभागाकडे राज्यपालांसाठी विमान प्रवासासाठी परवानगीची मागणी झाली. त्यानंतर रितसर परवानगी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पत्र पाठवले पण परवानगी देण्यात आली नाही. राजभवन कार्यालयाने सुद्धा यासंदर्भात माहिती जाणून घेणे अपेक्षित आहे. पण याबद्दल कोणतीही विचारपुस करण्यात आली नाही. राज्यपाल सकाळी थेट राजभवनातून निघाले आणि विमानतळावर पोहोचले.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध करून दिले जात असते. पण आधीच मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगी दिली गेली नसल्याने राज्यपालांना विमान उपलब्ध नव्हते दिले गेले नाही, अशी माहिती वरिष्ठ आयएएस अधिकारी यांनी दिली.

अजित पवारांनी पत्रकारांना झापले

दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांना विमान न दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार टीकास्त्र सोडले. 'जसं राज्यपालांना विमानातून उतरावे लागले तसे सत्तेतून महाविकास आघाडीला उतरावे लागणार अशी टीका भाजपचे नेते करत आहे', असा प्रश्न विचारला असता अजित पवार पत्रकारांवर भडकल्याचे पाहण्यास मिळाले.

'मी आधीच तुम्हाला सांगितले आहे, मला या प्रकरणाबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. मी रात्री कुठे होतो आणि इथं कधी पोहोचलो, याबद्दल सगळं सांगितलं आहे. ज्यावेळी एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारताय त्यावर मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून उत्तर देतोय, माझ्याकडे अजून पूर्ण माहिती आली नाही, असं सांगितलं असल्यावर परत परत तोच प्रश्न का विचारला जात आहे.  मी मंत्रालयात जाऊन संबंधित विभागाशी यावर माहिती घेईन' असं अजित पवार म्हणाले.

First published:

Tags: राज्यपाल