मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राम मंदिर जमीन घोटाळा हा सुद्धा ईडीच्या तपासाचा विषय पण.., राऊतांचं टीकास्त्र

राम मंदिर जमीन घोटाळा हा सुद्धा ईडीच्या तपासाचा विषय पण.., राऊतांचं टीकास्त्र

''अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय यांच्या नातेवाईकांनी कवडीमोल किंमतीने जमिनी घेतल्या व कोट्यवधी रुपयांना...''

''अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय यांच्या नातेवाईकांनी कवडीमोल किंमतीने जमिनी घेतल्या व कोट्यवधी रुपयांना...''

''अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय यांच्या नातेवाईकांनी कवडीमोल किंमतीने जमिनी घेतल्या व कोट्यवधी रुपयांना...''

मुंबई, 27 जून : राम मंदिर जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे (ram mandir land scam) देशभरात खळबळ उडाली आहे. मुळात हा सगळ्य़ात मोठा जमीन घोटाळा अयोध्येत श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यात झाल्याचे समोर आले. हे प्रकरण ‘ईडी’ किंवा ‘सीबीआय’ तपासाचा विषय आहे, पण ते सर्व मोकळेच आहेत' असं म्हणत संजय राऊत (sanjay raut) यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे.

राम मंदिर जमीन गैरव्यवहार प्रकरणी सामनामध्ये अग्रलेख लिहिण्यात आला होता. या लेखावरून शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिवसैनिकांमध्ये मोठा राडा पाहण्यास मिळाला होता. आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी राम मंदिर गैरव्यवहार प्रकरणावर रोखठोक सदरातून भाष्य केले आहे.

'शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या जमीन व्यवहार प्रकरणात घोळ आहे म्हणून ‘ईडी’ने त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. पण सध्या सगळ्य़ात मोठा जमीन घोटाळा अयोध्येत श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यात झाल्याचे समोर आले. अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय यांच्या नातेवाईकांनी कवडीमोल किंमतीने जमिनी घेतल्या व कोट्यवधी रुपयांना श्रीराम जन्मभूमी न्यासाला विकल्या. हा सुद्धा ‘ईडी’ किंवा ‘सीबीआय’ तपासाचा विषय आहे, पण ते सर्व मोकळेच आहेत' अशी टीकाही राऊत यांनी केली.

सरनाईक का झाले हतबल?

महाराष्ट्र विधानसभेचे एक सदस्य प्रताप सरनाईक हे गेल्या पाच महिन्यांपासून परागंदा आहेत. ‘ईडी’चे तपास अधिकारी त्यांच्या मागे हात धुऊन लागले. सरनाईक व त्यांच्या कुटुंबीयांना या सर्व प्रकरणात मनस्ताप सुरू आहे. सरनाईक यांनी एक पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिले व राजकारणात खळबळ उडवली. सरनाईक हे शिवसेनेचे आमदार. मुख्यमंत्री शिवसेनेचे.

RD Burman Birth Anniversary: आर.डी बर्मन यांना ‘पंचम दा’ का म्हणतात?

तरीही त्यांनी हे पत्र लिहिले. सरनाईक यांना सुरुवातीला ‘ईडी’चे समन्स आले तेव्हा भाजप व ईडीच्या अन्यायाशी शेवटपर्यंत लढेन असे त्यांनी सांगितले. अर्णब गोस्वामीविरुद्ध हक्कभंग आणून खळबळ माजवणारे सरनाईक असे हतबल का झाले? आमदार सरनाईक यांचा त्रागा मुख्यमंत्र्यांना असे टोकाचे पत्र लिहिण्यापर्यंत का गेला? ‘‘माझ्याबरोबर माझ्या कुटुंबियांचाही छळ सुरू आहे, तो थांबवा!’’ हे त्यांचे म्हणणे, असं राऊत यांनी सांगितलं.

अजितदादांच्या सीबीआय चौकशीची मागणी म्हणजे...

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना कोण ओळखत नाही! त्यांच्या भ्रष्टाचारविरुद्ध चळवळीने भल्याभल्यांची झोप उडवली. दमानिया यांनी सांगितले आहे की, ‘अविनाश भोसले यांची मालमत्ता ‘ईडी’कडून सील हा फक्त अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे काय?’ कारवाई सरळ मार्गाने व्हावी, पण ईडी हे सर्व भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी करत आहे. दमानियांचे म्हणणे असे, ‘‘अविनाश भोसले अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत हे सर्वांनाच माहीत आहे.

आजचं राशीभविष्य : प्रत्येक राशीच्या व्यक्तीला करावा लागणार अडचणीचा सामना

भोसले यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई म्हणजे भाजप किंवा केंद्राकडून ‘ईडी’ला मिळालेला आदेश आहे. सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणांचा वापर राजकीय कारणांसाठी होताना दिसत आहे.’’ अंजली दमानिया पुढे सांगतात ते अत्यंत महत्त्वाचे, ‘‘सध्याच्या घडीला शिवसेनेसोबत ‘प्लॅन ए’प्रमाणे बोलणी सुरू असतील तर ‘प्लॅन बी’ तयार असावा यासाठी ते अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हे सर्व किळसवाणे राजकारण आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळालीच पाहिजे हे त्यांचे ध्येय आहे!’’ अशी टीका राऊत यांनी केली.

First published:
top videos

    Tags: Samana, Shivsena