जाहिरात
मराठी बातम्या / राशीभविष्य / आजचं राशीभविष्य : प्रत्येक राशीच्या व्यक्तीला करावा लागणार अडचणीचा सामना; तुमच्या राशीत कोणती समस्या

आजचं राशीभविष्य : प्रत्येक राशीच्या व्यक्तीला करावा लागणार अडचणीचा सामना; तुमच्या राशीत कोणती समस्या

दैनंदिन राशिभविष्य

दैनंदिन राशिभविष्य

आज शक्यतो आराम करा.

  • -MIN READ
  • Last Updated :

आज रविवार दिनांक 27 जून 2021 आज संकष्टी चतुर्थी आहे. दिवस शुभ आहे. चंद्र  मकर राशीतून भ्रमण करेल. आजचं बारा राशींचे राशी भविष्य. मेष दशमातील शनि चंद्र योग हा नको असताना काही भानगडी निर्माण करणारा आहे. मंगळ विचित्र अशी अस्वस्थता निर्माण करेल. घरी पाहुणे येतील. शांत राहून दिवस घालवा. वृषभ आज रविवार फार कष्ट ना करता शांततेत घालवा. भाग्य स्थानातील शनि चंद्र, काही धार्मिक, वाचनात, वेळ घालवाल. फार काही योजना आखू नका. दिवस बरा आहे. मिथुन दिवस संथ, त्रासदायक आणि मनस्ताप देणारा होईल. शनि चंद्र अष्टमात शारीरिक कष्ट दाखवत आहेत. डोळे लाल होणे, सर्दी यापासून जपा. आज घरी आराम करा. प्रवास टाळा. कर्क राशीच्या समोर मकर राशीत चंद्र शनि आणि प्रतियोग करणारा मंगळ आज थोडी नाजूक मनस्थिती करेल. जास्त धाडस अजिबात नको. घरी  राहणं उत्तम. जोडीदाराची मनस्थिती बिघडू शकते. सिंह षष्ठ स्थानात शनि चंद्र आणि व्यय स्थानातील मंगळ फारसे अनुकूल नाहीत. काही नुकसान, वस्तू खराब होणं असं परिणाम होतील. शारीरिक कष्ट होतील. गुरु कृपा असेल. कन्या आज मुलांना जपा. अति दगदग करू नका. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या. काही आध्यात्मिक वाचन करा किंवा उपासना फल देणारी ठरेल. शुक्र मात्र लाभ देण्यास  उत्सुक आहे. तुला काही घर किंवा आईसंबंधी समस्या निर्माण होईल. तुम्हाला जर काही हृदयविकार असेल तर तपासणी करून घ्यावी लागेल. आराम करा असे आज ग्रह सांगत आहेत. वृश्चिक तृतीय स्थानातील चंद्र शनि भावंडाशी मतभेद होतील असे सांगत आहेत. आज आपल्या कठोर शब्दांवर जरा नियंत्रण ठेवा. म्हणजे रोजचे रुटीन करायला हरकत नाही. प्रवास टाळा. धनु धनस्थानातील शनि चंद्र अष्टमात मंगळ ही ग्रहस्थिती फारशी अनुकूल नाही. दुखापत, पडणं, लागणं सांभाळा. आर्थिक व्यवहार आज नको. फसवणूक होऊ शकते. मकर राशीतील शनि चंद्र शीत विकार, अंगदुखीपासून त्रास देईल. जोडीदार आपल्या मनाविरुद्ध वागेल. आर्थिक बाजू ठिक राहिल. मुलांना अचानक समस्या येऊ शकते. शनी उपासना करावी. कुंभ आजचा दिवस स्वतःला जपा. भांडणतंटा नको असेल तर घरात शांत रहा. घरात काही जास्तीचं काम उरकून टाका. मनःशांतीसाठी काही जप, उपासना करणं योग्य राहील. मीन लाभ स्थानातील ग्रह शुभ फळ देतील. पण मुलांचे प्रश्न मार्गी लावावे लागतील. गर्भवती स्त्रियांनी जपून रहावं, अति ताण, दगदग नको. दिवस  शांततेत घरी  घालवा. सर्व राशींना आज श्री गणरायाची आराधना आणि अथर्वशीर्ष पाठ फायद्याचे ठरेल. शुभम भवतु!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात