• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • RD Burman Birth Anniversary: आर.डी बर्मन यांना ‘पंचम दा’ का म्हणतात?

RD Burman Birth Anniversary: आर.डी बर्मन यांना ‘पंचम दा’ का म्हणतात?

बर्मन यांना पंचम दा या नावानं देखील हाक मारली जायची. आज त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्तानं जाणून घेऊया या मागचा गंमतीशीर किस्सा…

 • Share this:
  मुंबई 27 जून: राहुल देव बर्मन अर्थात आर.डी बर्मन (RD Burman) हे भारतातील सर्वोत्कृष्ट संगीतकारांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या करिअरमध्ये क्या हुआ तेरा वादा, मेहबुबा, चुरा लिया है तुमने, ओ मेरे दिल के चैन यांसारख्या शेकडो सुपरहिट गाण्यांनी निर्मिती केली. (RD Burman best songs) 70च्या दशकात तर त्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. जवळपास तीन दशकं मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या आर.डी.बर्मन यांचा आज स्मृतीदिन आहे. (RD Burman Birth Anniversary) तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल त्यांना पंचम दा असं या नावानं देखील हाक मारली जायची. आज त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्तानं जाणून घेऊया या मागचा गंमतीशीर किस्सा… 6 वर्ष मोठ्या आशा भोसलेंवर होतं बर्मन यांचं प्रेम; लता दिदींनी केली होती मदत आर.डी बर्मन यांना 'पंचम दा' हे नाव कसं मिळालं याचा किस्सा अतिशय रंजक आहे. असं म्हणतात की, ‘आर. डी बर्मन जेव्हा लहान होते तेव्हा ते 5 व्या नोटवर रडायचे त्यामुळे त्यांचं नाव पंचम ठेवण्यात आलं.’ अजूनही एक किस्सा सांगितला जातो, तो असा की, ‘पंचम दा जेव्हा अशोक कुमार यांना कामानिमित्त पहिल्यांदा भेटले तेव्हा ते सारखे ‘प’ या शब्दाचा उच्चार करत होते त्यामुळे अशोक कुमार यांनी त्यांचं नाव पंचम दा असं ठेवलं.’ जेठालालची ‘गुलाबो’ खऱ्या आयुष्यात आहे डेंजर; सलमानचही तोंड केलं होतं बंद आरडी बर्मन यांचे वडील एसडी बर्मन एक महान संगीतकार होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत बरंच नाव कमावलं होतं. त्यामुळे आरडी बर्मन यांना घरातूनच संगीताचं बाळकडू मिळालं होतं. आरडींनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी पहिलं गाणं संगीतबद्ध केलं होतं. आणि बॉलिवूडमध्ये अवघ्या 17 व्या वर्षी पाऊल टाकलं होतं.
  Published by:Mandar Gurav
  First published: