जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'Coronavirus हा जेवढा मोठा केला गेला, तेवढा भयंकर नाही'

'Coronavirus हा जेवढा मोठा केला गेला, तेवढा भयंकर नाही'

'Coronavirus हा जेवढा मोठा केला गेला, तेवढा भयंकर नाही'

CNBC-TV18 ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी ही माहिती दिली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 जून : Coronavirus हा आजार जेवढा मोठा केला आणि त्याची जेवढी भीती समाजमानसात आहे, तेवढा तो भयंकर नाही. अर्थव्यवस्थेचं नुकसान मात्र या भीतीमुळे मोठं होऊ शकतं, असा इशारा अर्थक्षेत्रातलं मोठं नाव असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांनी दिला आहे. भारतासह जगात कोरोनाचं थैमान सुरू आहे, हे खरं. पण हा आजार साध्या फ्लूसारखा आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट होईल. भारतात कोरोनाचा मृत्यूदर कमी आहे आणि लोकसंख्येच्या मानाने संसर्गही कमी आहे. त्यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही, असं झुनझुनवाला म्हणतात. राकेश झुनझुनवाला भारतातील सर्वात मोठे गुंतवणूकदार आहेत. भारतीय शेअर बाजारातील (Stock Market) राजा (king) अशी त्यांची खास ओळख आहे. त्यांचा उल्लेख भारताचा वॉरेन बफे असाही केला जातो. फोर्ब्सकडून जगातील श्रीमंताची यादी जाहीर केली जाते. या यादीमध्ये भारतातील श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांचं नावही आहे. CNBC-TV18 ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी ही माहिती दिली. कोरोना हा साधा एक फ्लू आहे. त्याच्याबद्द उगाच नको ती भीती मनात बळगू नये. कोरोनासोबत जगण्याची सवय करून घ्यायला हवी. केंद्र आणि राज्य सरकारनं आता अर्थव्यवस्था खुली करायला हवी. यासोबत संस्थांमध्ये बेरोजगारीची टक्केवारी किती घसरली आहे याचं प्रमाण पाहाणं महत्त्वाचं आहे. पुढे राकेश झुनझुनवाला म्हणतात मी जर अर्थशास्त्रज्ञांचं म्हणणं ऐकत राहिलो असतो तर कधीही पैसे कमवू शकलो नसतो शेअर बाजारावर या सगळ्याचा तितकासा परिणाम होईल असं मला वाटतं. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आपण सावधगिरी बाळगून अर्थव्यवस्था सुरू करायला हवी असंही त्यांनी सांगितलं आहे. हे वाचा- ‘कोरोना योद्ध्यांवर हल्ले कराल तर…’, PM मोदींनी कठोर कारवाईचे दिले संकेत हे वाचा- मोठी बातमी! लॉकडाऊनंतर शाळा-महाविद्यालयांमध्ये होणार हे 5 बदल हे वाचा- 7 दिवसांत 48 हजार नवीन रुग्णांची नोंद, तरी भारतासाठी एक दिलासादायक बातमी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात