नवी दिल्ली, 01 जून : भारतात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा 1 लाख 90 हजार 535 झाला आहे. गेल्या 24 तासांत देशात 8392 नवीन रुग्ण सापडले आहेत तर, 230 लोकांचा मृत्यू झाला आहे. केवळ 5 दिवसांत भारतात कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाख 90 हजार पर्यंत पोहचला आहे. भारत सध्या कोरोना प्रभावित देशांमध्ये सातव्या क्रमांकावर आला आहे. दुसरीकडे केंद्र सरकारनं आजपासून लॉकडाऊन 5 तर अनलॉक 1.0ची घोषणा केली आहे. अशी परिस्थिती असली तरी भारतासाठी एक दिलासादायक बातमीही आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात 93 हजार 322 सक्रिय प्रकरणं आहेत. तर, आतापर्यंत 5 हजार 394 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र दिलासादायक बातमी म्हणजे 1 लाख 90 हजार एकूण रुग्णांपैकी 91 हजार 818 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याचा अर्थ भारताचा रिक्वरी रेटही वाढत आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी 4300 लोकं निरोगी होऊ घरी परतली. जगभरातील इतर देशांच्या मानानं भारताचा रिक्वरी रेट जास्त असल्यामुळं काही अंशी सरकारची चिंता मिटली आहे. वाचा- Covid-19 : 24 तासात कोरोना रुग्णांत विक्रमी वाढ, जगात भारत 7व्या क्रमांकावर मात्र कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. देशात गेल्या 7 दिवसात 48 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा देशात 30 जानेवारी रोजी मिळालेल्या पहिल्या रुग्णांनंतर चौपट आहे. 12 दिवसांत 2000 लोकांचा मृत्यू एकीकडे निरोगी रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्यू दरही काही प्रमाणात वाढला आहे. गेल्या 12 दिवसांत देशात 2000 लोकांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण मृतांची संख्या आता 5 हजार 394 झाली आहे. वाचा- करून दाखवलं! आदित्य ठाकरेंनी दिली मुंबईतील ‘या’ परिसराबद्दल Good News अशी आहे राज्यांची परिस्थिती महाराष्ट्रात आतापर्यंत राज्यात 67 हजार 655 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यापैकी 36 हजार 040 रूग्णांवर उपचार सुरू आहेत तर 29 हजार 329 लोक बरे झाले आहेत. त्याच वेळी, 2286 लोक मरण पावले आहेत. राजधानी दिल्लीत एकूण 19 हजार 844 प्रकरणं आहेत, त्यापैकी 10 हजार 893 सक्रिय रूग्ण आहेत. त्याच वेळी 8478 लोक बरे झाले आहेत. 473 लोक मरण पावले आहेत. मध्य प्रदेशात 8089 प्रकरणांमध्ये 2897 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी 4842 लोक बरे झाले आहेत, तर 350 लोक मरण पावले आहेत. उत्तर प्रदेशात कोरोना रूग्णांची संख्या 7823 वर पोहोचली आहे. 213 लोक मरण पावले आहेत. बिहारमधील 3815, चंडीगडमध्ये 293, छत्तीसगडमध्ये 498, गोव्यात 70, हरियाणामध्ये 2091 रुग्ण आढळले आहेत. कोरोना संसर्गामुळे गुजरातलाही मोठी बाधा झाली आहे. राज्यात आतापर्यंत 16 हजार 779 रुग्ण आढळले आहेत. मृतांची संख्या 1038 आहे. तमिळनाडूमध्ये 22 हजार 333 कोरोना प्रकरणे आहेत. यापैकी 9403 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत 173 जणांचा मृत्यू झाला आहे. वाचा- पुणेकरांना आता पडता येणार बाहेर, असे असतील नवे नियम आणि अटी संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.