'कोरोना योद्ध्यांवर हल्ले कराल तर...', PM मोदींनी कठोर कारवाईचे दिले संकेत

'कोरोना योद्ध्यांवर हल्ले कराल तर...', PM मोदींनी कठोर कारवाईचे दिले संकेत

कोरोनाविरूद्धच्या युद्धात भारत नक्कीच जिंकेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान म्हणाले की कोव्हिड -19 व्हायरस हा अदृश्य शत्रू आहे, पण मला विश्वास आहे की आपले वैद्यकीय कर्मचारी त्याचा पराभव करतील.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज बंगळुरू येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी कोरोना संकटावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, दुसर्‍या महायुद्धानंतरचे जगावरील हे सर्वात मोठे संकट आहे. महायुद्धानंतर जसे जग होते, तसेच कोरोनानंतर जग पूर्णपणे बदलेल.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांना वर्दी नसलेले सैनिक असे संबोधित केले. कोरोनाविरूद्धच्या युद्धात भारत नक्कीच जिंकेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांनी यावेळी, म्हणाले की कोव्हिड -19 व्हायरस हा अदृश्य शत्रू आहे, पण मला विश्वास आहे की आपले वैद्यकीय कर्मचारी त्याचा पराभव करतील, असे म्हणत वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.

वाचा PM मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

>> पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले, 'पूर्वी जागतिकीकरणाबाबतच्या आर्थिक विषयावर चर्चा झाली होती, पण आता मानवतेच्या आधारे चर्चा होणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत, भारताने गेल्या 6 वर्षात मोठे निर्णय घेतले आहेत, आम्ही चार स्तंभांवर काम करत आहोत.

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी असेही म्हणाले की, आज आरोग्य कर्मचारी सैनिकांप्रमाणे देशासाठी लढत आहेत. कोरोना दिसत नाही, पण कोरोना योद्धाची कठोर परिश्रम आज दिसून येते. पंतप्रधान म्हणाले की, जगाचे डोळे आज भारतातील डॉक्टरांवर आहेत.

>> पंतप्रधान म्हणाले की, कोरोना व्हायरस अदृश्य असला तरी कोरोना योद्धा अदृश्य नाही आहेत. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी हे वर्दी नसलेले सैनिक आहेत. म्हणूनच मानवतेशी संबंधित विकासाकडे आपण लक्ष दिले पाहिजे.

>> पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशात पीपीई किट, एन-95 मुखवटे बनविण्यात आले आहेत आणि ते सर्व भारतात बनविले गेले आहेत. आरोग्य सेतु अॅप देशात बनविण्यात आला आहे आणि आतापर्यंत 12 कोटी लोकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे.

>> पंतप्रधान म्हणाले की मिशन इंद्रधनुष, आयुष्मान भारत यांच्यासह अनेक महत्त्वपूर्ण योजनांनी देशाच्या आरोग्य व्यवस्थेला नवीन जीवन दिले आहे.

'वैद्यकिय कर्मचाऱ्यांवरील हल्ले खपवून घेणार नाही'

पंतप्रधानांनी स्पष्ट केले की आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसाचार अजिबात खपवून घेतला जाणार नाही. ते म्हणाले की आम्ही यासाठी पावले उचलली आहेत. ते म्हणाले की, अग्रगण्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विमाही देण्यात आला आहे. ते म्हणाले, 'डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगारांसह हिंसाचार आणि गैरवर्तन योग्य नाही. अशा गोष्टी थांबविण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. देशात आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले खपवून घेण्यात येणार नाही, जो असे करेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.

First published: June 1, 2020, 12:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading