मोठी बातमी! लॉकडाऊनंतर शाळा-महाविद्यालयांमध्ये होणार हे 5 बदल

मोठी बातमी! लॉकडाऊनंतर शाळा-महाविद्यालयांमध्ये होणार हे 5 बदल

मार्चपासून शाळा आणि महाविद्यालयांना कोरोना-लॉकडाऊनमुळे सुट्टी देण्यात आली होती. आता शाळा सुरु करण्याच्या हालचाही काही राज्यांमध्ये सुरू आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 जून : देशात सोमवार पासून अर्थव्यस्थेचा एक मोठा हिस्सा सुरू कऱण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यासोबतच Unlock 1.0 मध्ये काही भागांतील शाळा-महाविद्यालये सुरू कऱण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी कशा पद्धतीनं शाळा आणि महाविद्यालं सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. लॉकडाउन उघडल्यानंतर, जेव्हा विद्यार्थी शाळेत जातील तेव्हा तिथली परिस्थिती कशी असेल. सद्य परिस्थितीत शाळांमध्ये कोणत्या पद्धती अवलंबल्या जाण्याचा शक्यता आहे हे आज पाहणार आहोत.

दोन सत्रास भरणार शाळा

एका वर्गात जर 40 विद्यार्थी असतील तर एकावेळी वर्गात केवळ 20 विद्यार्थी असणं आवश्यक आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होऊ शकतं. पण असं केल्यानं शिक्षक आणि जागेची कमतरता भासू शकते त्यामुळे दोन सत्रात शाळा- महाविद्यालयं सुरू कऱण्यात यावीत. सकाळच्या सत्रात 20 तर दुपारच्या सत्रात 20 विद्यार्थी किंवा जागेच्या उपलब्धतेनुसार विद्यार्थी संख्या ठरवावी.

हे वाचा-Covid-19 : 24 तासात कोरोना रुग्णांत विक्रमी वाढ, जगात भारत 7व्या क्रमांकावर

ऑनलाइन-ऑफलाइन क्लासरुम

यामध्ये ज्यांना शक्य आहे किंवा 50 टक्के विद्यार्थी हे वर्गात तर 50 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीनं शिकावं. त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यामुळे शिक्षक आणि शाळेतील भासणारी जागेची कमतरता या दोन्ही समस्या दूर होतील. सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल.

6 दिवसांचा होणार आठवडा

अनेक विद्यापीठ आणि शाळांमध्ये 5 दिवसांचा आठवडा आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी 5 ऐवजी 6 दिवसांचा आठवडा करण्यात येणार आहे.

हे वाचा-अनलॉक 1.0 च्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण, असे आहेत आजचे दर

सम विषम संख्यांचा वापर करून नियोजन

हा फॉर्म्युला साधारण प्रदूषण रोखण्यासाठी गाड्यांना वापरण्यात येतो. पण शाळा महाविद्यालयातही वर्ग आणि एकूण अभ्यासासाठी ह्या नियमाचा अवलंब करण्याचा विचार सुरू आहे. त्याचं नियोजन कशापद्धतीनं होतं हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ट्रान्सपोर्ट

बर्‍याच शाळा शाळा वाहतुकीवर मर्यादा घालण्याचाही विचार करत आहेत. अशा परिस्थितीत पालकांना आपल्या मुलांना शाळेत सोडण्याची जबाबदारी घेण्यास सांगितले जाऊ शकते. कारण लहान मुलांना एकमेकांच्या संपर्कात येण्यापासून रोखणे सोपे नाही. स्कूल बसमध्ये हे आणखी कठीण आहे.

हे वाचा-...तरच सरकारनं लॉकडाऊन हटवावा, AIIMSच्या डॉक्टरांनी दिला सल्ला

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 1, 2020, 11:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading