मुंबई, 19 मे : राज्यसभा निवडणुकीसाठी (rajya sabha election 2022) राज्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांची भेट घेतली आहे.भेटीत शिवसेनेनं संभाजीराजेंसमोर काही अटी ठेवल्या आहे. तर संभाजीराजेंनीही आपला प्रस्वाव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अपक्ष आमदारांची वर्षा निवास्थानी बैठक बोलवली होती. या बैठकीसाठी छत्रपती संभाजीराजे वर्षा बंगल्यावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यामध्ये 35 मिनिटं चर्चा झाली. या चर्चेत राज्यसभेच्या सहाव्या जागे संदर्भात चर्चा झाली.
वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव दिला. मात्र संभाजीराजेंनी शिवसेनेच्या या प्रत्सावात सुधारणा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. माझी उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करावी असा प्रस्ताव संभाजी राजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला. संभाजीराजे यांच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचार करून कळवतो असे सांगितलंय.
संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतले महत्वाचे मुद्दे
१) यौवराज संभाजीराजे छत्रपती शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले तरी संभाजीराजे राज्यसभेत शिवसेनेच्या खासदारांसोतच असणार.
२) राज्यसभेत शिवसेनेच्या धोरणात्मक निर्णायावर संभाजीराजे सोबतच रहाणार. राज्यसभेतील विधेयकं आणि इतर राजकिय निर्णयांना संभाजीराजेही शिवसेना पक्ष निर्णायासोतच रहाणार.
३) अगामी सर्व निवडणुकांमध्ये छत्रपती संभाजीराजे शिवसेनेचा प्रचार करणार
४) शिवसेनेच्या सहकार्याने आणि महाविकास आघाडी पुरस्कृत राज्यसभेचे उमेदवार म्हणून संभाजीराजे छत्रपती असले तरी संभाजीराजे छत्रपती शिवसेनेचे २३ वे खासदार म्हणूनच कार्यरत राहणार.
५) युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला सोबत घेऊन "स्वराज्य" ही संघटना स्थापन करीत स्वत:ची राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून घोषणा केली. तसंच सर्व पक्षांच्या आमदारांनी त्यांनी मतदान करावं अशी त्यांनी पत्राद्वारे विनंतीही केली.
संभाजीराजे यांच्या या निर्णयामुळेच शिवसेनेला हा प्रस्ताव द्यावा लागला आहे. त्यात आता संभाजीराजे यांनी काही सृुधारणाही सूचवल्या आहेत. संभाजीराजे यांच्या सुधारीत प्रस्तावावर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, त्यावरच राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवार म्हणून शिवसेना त्यांचा निर्णय जाहीर करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.