विनोद राठोड, प्रतिनिधी
मुंबई, 17 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) हे पुण्याच्या दोऱ्यावर (Raj Thackeray Pune tour) आहेत. त्याच दरम्यान येत्या 21 मे रोजी राज ठाकरे हे पुण्यात जाहीर सभा (Raj Thackeray Rally in Pune) घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या झालेल्या सभा आणि त्यासभेत त्यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावर मांडलेली भूमिका यामुळे वातावरण चांगलेच तापल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आता 21 मे रोजी पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार की नाही? याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांची प्रतिक्रिया आली आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारण्याचं काहीही कारण नाही. परवानगी मागितली तर पोलीस आयुक्त परवानगी देतील. पोलीस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमांनुसार राज ठाकरेंनी सभा घेण्यासाठी काहीही हरकत नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे राज ठाकरेंच्या सभेचा मार्ग मोकळा झाल्याचं स्पष्ट आहे.
वाचा : राज्यसभेसाठी मविआत रस्सीखेच; सहाव्या जागेसाठी शिवसेना आग्रही, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
डेक्कन नदी पात्रात होणार सभा
पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नदीपात्राच्या जागेत 21 मे रोजी राज ठाकरेंची सभा होणार आहे. या संदर्भात परवानगी मिळावी म्हणून पुण्याचे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पोलिसांना पत्र दिलं आहे. यानंतर पोलिसांनी या जागेची पाहणी सुद्धा केली.
या संदर्भात पुण्याच्या पोलिसांनी सागितले, अद्याप परवानगी दिलेली नाहीये, परवानगी विचाराधीन आहे. या संदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार परवानगी देण्यात येईल.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मुद्याला विरोध करणारे मनसेचे नेते वसंत मोरे चर्चेत आले होते. वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून काढून टाकल्यामुळे ते इतर पक्षात जातील अशी चर्चा रंगली आहे. आता राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी फोन करून वसंत मोरेंना बैठकीला बोलावले आहे.
पुण्यात मनसेमध्ये मागील काही दिवसांपासून घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरेंनी एकीकडे हिंदुत्वाचा मुद्या हाती घेऊन वाटचाल केली आहे. पण, त्यांच्याच निर्णयाला वसंत मोरे यांनी विरोध केला होता. गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न मनसेत सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Mumbai, Pune, Raj Thackeray