जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Raj Thackeray यांच्या विरोधात बृजभूषण यांना राष्ट्रवादीने रसद पुरवली? मनसेने शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चांना उधाण

Raj Thackeray यांच्या विरोधात बृजभूषण यांना राष्ट्रवादीने रसद पुरवली? मनसेने शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चांना उधाण

राज ठाकरेंच्या विरोधात बृजभूषण यांना राष्ट्रवादीने रसद पुरवली? मनसेने शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चांना उधाण

राज ठाकरेंच्या विरोधात बृजभूषण यांना राष्ट्रवादीने रसद पुरवली? मनसेने शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चांना उधाण

Raj Thackeray Ayodhya Tour: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला आहे. त्याच दरम्यान आता मनसे नेत्याने शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 मे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित (Raj Thackeray Ayodhya Tour postponed) केला. हा दौरा स्थगित करण्यामागचं कारण काय होतं हे राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत सांगितलं. इतकंच नाही तर आपला दौरा रद्द होण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला. राज ठाकरे यांचा रोख नेमका कोणाकडे होता? यावरुन विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. त्याच दरम्यान आता मनसेचे सरचिटणीस सचिन मोरे यांनी काही फोटोज सोशल मीडियात शेअर केले आहेत आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात काही चर्चा सुरू झाल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे तेथील खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांनी विरोध केला होता. जोपर्यंत उत्तरभारतीयांची राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत अयोध्येत येऊ देणार नाही असं बृजभूषण यांनी म्हटलं होतं. याच बृजभूषण सिंह यांचे जुने फोटो मनसेकडून शेअर करण्यात आले आहेत. या फोटोजमध्ये बृजभूषण सिंह हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत स्टेजवर एका कार्यक्रमात आहेत. तसेच खासदार सुप्रिया सुळे सुद्धा फोटोमध्ये दिसत आहेत.

जाहिरात

मनसेकडून शेअर करण्यात आलेल्या या फोटोंमुळे आता विविध चर्चा रंगत आहेत. ‘कुछ फोटो अच्छे भी होते है, और सच्चे भी होते है’ असं कॅप्शन लिहून हे फोटो मनसेकडून शेअर करण्यात आले आहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी शरद पवारांनी रसद पुरवली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाचा :  अयोध्या दौऱ्याला विरोध हा एक सापळा, राज ठाकरेंनी सांगितलं दौरा स्थगित करण्यामागचं कारण काय म्हणाले होते राज ठाकरे? राज ठाकरे पुण्यातील सभेत म्हणाले होते, अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्याचं म्हटलं. अनेकांना वाईट वाटलं, अनेकांना आनंद झाला. अनेकजण गुपचूप बोलू लागले. मी मुद्दाम मध्ये दोन दिवस घेतले. की काय बोलायचं ते बोलून घ्या एकदाचं. मग माझी भूमिका महाराष्ट्र, देशाला सांगेल असं म्हटलं. ज्या दिवशी मी लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली आणि त्यानंतर अयोध्येला जाणार याच्या तारखेची घोषणा पुण्यात केली. त्यानंतर काही दिवसातच हे सर्व प्रकरण सुरू झालं. की, अयोध्येला जाणार नाही. मग ते प्रकरण सर्व वाढू लागलं. मी सर्व पाहत होतो की काय सुरू आहे. मला मुंबई, दिल्ली, उत्तरप्रदेशातून काही गोष्टींची माहिती मिळत होती की नेमकं काय चाललं आहे. एक वेळ आली आणि माझ्या लक्षात आलं की, हा एक ट्रॅप आहे, हा सापळा आहे. आपण या सापळ्यात अडकलं नाही पाहिजे. ही सर्व गोष्टींची सुरुवात झाली त्याची रसद पुरवली गेली त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. की या सर्व गोष्टी पुन्हा बाहेर काढा. ज्यांना-ज्यांना माझी अयोध्यावारी खूपली असे अनेकजण होते. त्या सर्वांनी सर्वगोष्टी मिळून सर्व आराखडा आखला. मी एकाच गोष्टीचा विचार केला.. मी खरंतर अयोध्येला जाणार. रामजन्मभूमीचं दर्शन घेणं हे आलंच.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात