Home /News /maharashtra /

Raj Thackeray: अयोध्या दौऱ्याला विरोध हा एक सापळा, राज ठाकरेंनी सांगितलं दौरा स्थगित करण्यामागचं कारण

Raj Thackeray: अयोध्या दौऱ्याला विरोध हा एक सापळा, राज ठाकरेंनी सांगितलं दौरा स्थगित करण्यामागचं कारण

Raj Thackeray: अयोध्या दौऱ्याला विरोध हा एक सापळा, राज ठाकरेंनी सांगितलं दौरा स्थगित करण्यामागचं कारण

Raj Thackeray: अयोध्या दौऱ्याला विरोध हा एक सापळा, राज ठाकरेंनी सांगितलं दौरा स्थगित करण्यामागचं कारण

Raj Thackeray sabha: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत भाष्य केलं आहे.

    पुणे, 22 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आपला 5 जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी आपला हा दौरा स्थगित (Raj Thackeray Ayodhya visit postponed) करण्याचं ट्विटरवरुन जाहीर केलं. तसेच हा दौरा नेमका का स्थगित केला याबाबत पुण्यातील सभेत सांगणार असल्याचं त्यांनी म्हटलं. पण राज ठाकरे यांचा दौरा स्थगित करण्यावरुन विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. पण आज अखेर याबाबत स्वत: भाष्य केलं आहे. आज राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत म्हटलं, माझ्या पायाचं दुखणं सुरू आहे. त्यामुळे कमरेला त्रास होतो. म्हणून मी पुण्यातून मुंबईला गेलो. डॉक्टरांशी बोललो, तर येत्या 1 तारखेला शस्त्रक्रिया करतोय. पायाचं दुखणं सुरू आहे त्यामुळे कमरेला त्रास होतोय. ...मुद्दाम सांगितलं नाहीतर पत्रकार नको ते अवयव काढतील. राज ठाकरे म्हणाले, अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्याचं म्हटलं. अनेकांना वाईट वाटलं, अनेकांना आनंद झाला. अनेकजण गुपचूप बोलू लागले. मी मुद्दाम मध्ये दोन दिवस घेतले. की काय बोलायचं ते बोलून घ्या एकदाचं. मग माझी भूमिका महाराष्ट्र, देशाला सांगेल असं म्हटलं. ज्या दिवशी मी लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली आणि त्यानंतर अयोध्येला जाणार याच्या तारखेची घोषणा पुण्यात केली. त्यानंतर काही दिवसातच हे सर्व प्रकरण सुरू झालं. की, अयोध्येला जाणार नाही. मग ते प्रकरण सर्व वाढू लागलं. मी सर्व पाहत होतो की काय सुरू आहे. मला मुंबई, दिल्ली, उत्तरप्रदेशातून काही गोष्टींची माहिती मिळत होती की नेमकं काय चाललं आहे. एक वेळ आली आणि माझ्या लक्षात आलं की, हा एक ट्रॅप आहे, हा सापळा आहे. आपण या सापळ्यात अडकलं नाही पाहिजे. ही सर्व गोष्टींची सुरुवात झाली त्याची रसद पुरवली गेली त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. की या सर्व गोष्टी पुन्हा बाहेर काढा. ज्यांना-ज्यांना माझी अयोध्यावारी खूपली असे अनेकजण होते. त्या सर्वांनी सर्वगोष्टी मिळून सर्व आराखडा आखला. मी एकाच गोष्टीचा विचार केला.. मी खरंतर अयोध्येला जाणार. रामजन्मभूमीचं दर्शन घेणं हे आलंच. वाचा : भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला तुमच्यापैकी अनेकजण जन्मालाही आले नसतील तेव्हा आजच्या सारखी चॅनल्स नव्हती. मला आजही आठवतंय... ज्यावेळी मुलायम सिंग यांचं उत्तरप्रदेशात सरकार होतं. ज्यावेळी भारतातील सर्व ठिकाणाहून अयोध्येला गेले होते तेव्हा सर्व कारसेवकांना ठार मारण्यात आलं होतं. त्या सर्व कारसेवकांची प्रेत शरयू नदीत तरंगताना मी व्हिडीओत पाहिलं होतं. मला रामजन्मभूमीचं तर दर्शन घ्यायचंच आहे प्रश्नच नाही. पण जिथे कारसेवक गेले आणि जिथे मारले गेले ती जागा अयोध्येला आहे त्याचंही दर्शन मला घ्यायचं आहे. असो... राजकारणात भावना अनेकांना समजत नाहीत असंही राज ठाकरे म्हणाले. ऐन निवडणुकीच्यावेळी कार्यकर्त्यांना गमवायचं नाही राज ठाकरेंनी पुढे म्हटलं, मला माहिती आहे की जर अयोध्येला गेलो तर राज्यातील हजारो महाराष्ट्रसैनिक, अनेक हिंदू बांधव तिकडे अयोध्येला आले असते आणि तिकडे जर काही झालं असतं तर आपली पोरं तर अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकल्या असत्या. तुम्हाला जेलमध्ये सडवलं गेलं असतं. आणि काहीही कारण नसताना तुमच्यावर अनेक केसेस टाकून जेलमध्ये टाकलं असतं. त्यानंतर तुम्हाला जेलमध्ये सडवलं असतं. मी म्हटलं आपली पोरं अशी घालवणार नाही. सर्व पदाधिकाऱ्यांवर, तुमच्यावर केसेस टाकल्या असत्या आणि ऐननिवडणुकीवेळी इथे कुणीही नसतं. हा सर्व ट्रॅप होता. मी जात नाही म्हणून चार शिव्या खायला टीका सहन करायला मी तयार ,त्यासाठी मी हकनाक पोर नाही घालवणार... भाजप खासदाराचा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध राज ठाकरेंनी हिंदुत्वाची आक्रमक भूमिका घेतली त्यानंतर त्यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा सुद्धा केली. मात्र, या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. उत्तरभारतीयांना झालेल्या मारहाण प्रकरणात जोपर्यंत राज ठाकरे उत्तरभारतीयांची माफी मागत नाहीत तोपर्यंत उत्तरप्रदेशात येऊ देणार नाही अशी भूमिका भाजप खासदार बृजभूषण यांनी घेतली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Ayodhya, BJP, MNS, Pune, Raj Thackeray

    पुढील बातम्या