कार्यकर्त्याच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना पुन्हा केलं 'हे' भावनिक आवाहन!

कार्यकर्त्याच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना पुन्हा केलं 'हे' भावनिक आवाहन!

'माझी तुम्हा सर्वाना कळकळीची विनंती आहे की कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका. ह्या आधी देखील अनेक कठीण प्रसंगांमधून आपण बाहेर पडलो ह्या प्रसंगावर देखील मात करू हे नक्की.'

  • Share this:

मुंबई 21 ऑगस्ट : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना EDने नोटीस बजावल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडालीय. पोलीस आता या घटनेची चौकशी करत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना संयम आणि सुबरीचा सल्ला दिलाय. राज म्हणाले, कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती आहे की कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका. ह्या आधी देखील अनेक कठीण प्रसंगांमधून आपण बाहेर पडलो आहोत त्यामुळे तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर आपण ह्या प्रसंगावर देखील मात करू हे नक्की. एक निवेदन प्रसिद्ध करत राज ठाकरे यांनी हे आवाहन केलंय.

काय म्हणाले राज ठाकरे?

''आपला सहकारी प्रवीण चौगुले ह्याच्या निधनाच्या बातमीने माझं मन व्यथित झालं आहे. मला ईडीची नोटीस आली, ह्या बातमीने अस्वस्थ होऊन प्रवीणने आत्मदहनासारखा टोकाचा मार्ग निवडला. हे व्हायला नको होतं. प्रवीणच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी इच्छा.

प्रवीणचं जसं माझ्यावर, पक्षावर प्रेम होतं तसंच तुम्हा सगळ्यांचं माझ्यावर, आपल्या पक्षावर मनापासून प्रेम आहे ह्याची मला जाणीव आहे.

राज ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले उद्धव, ED च्या चौकशीवर म्हणाले...

पण माझी तुम्हा सर्वाना कळकळीची विनंती आहे की कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका. ह्या आधी देखील अनेक कठीण प्रसंगांमधून आपण बाहेर पडलो आहोत त्यामुळे तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर आपण ह्या प्रसंगावर देखील मात करू हे नक्की.

ईडी सारख्या संस्थांना काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यांना मी योग्य ती उत्तरं देईन. म्हणून मी पुन्हा सांगतो, तुम्ही सर्वानी शांतता राखा आणि कोणीही उद्या ईडीच्या कार्यालयाच्या जवळ कोणीही येऊ नका. कालच्या माझ्या सूचनेनंतर देखील अनेक जण ईडीच्या कार्यालयाजवळ येण्याचा विचार करत आहेत असं मला कळलं, तुमचं खरंच माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही तिथे येणार नाही.

राष्ट्रवादीत मोठी खळबळ, अजित पवारांचा सगळ्यात जवळचा सहकारी शिवसेनेत?

आणि काल मी जे सांगितलं तेच पुन्हा सांगतो तुमच्या कुठल्याही कृतीने सर्वसामान्य माणसांना कोणताही त्रास होणार नाही अथवा सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही ह्याची काळजी घ्या.

बाकी ह्या विषयावर जे बोलायचं आहे ते मी योग्य वेळी बोलेनच.

कॉलेज कॅण्टीनमध्ये नो पिझ्झा, नो बर्गर; फास्ट फूडवर बंदी!

तो पर्यंत तुम्ही सर्वानी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची नीट काळजी घ्या."

काही मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

कपडे काढून दाखवू का? पुण्यात दारूड्या महिलेची पोलिसांनाच शिवीगाळ पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 04:47 PM IST

ताज्या बातम्या