हर्षल महाजन, नागपूर, 21 ऑगस्ट : फास्ट फूड हे तरुणांसाठी जीव की प्राण असतं. अनेक जण तर जेवणापेक्षा फास्ट फूडवरच आपला दिवस काढत असतात. पण जीभेचे चोचले पुरवणारं हे फूड शरीरासाठी हेल्दी नसते. त्यामुळे नागपूर विभागात आता फास्ट फूडला नो एण्ट्री करण्यात आलीय. कॉलेजमधल्या कँटिनमध्ये पिझ्झा आणि बर्गरसारखे खाद्यपदार्थ दिसल्यास तिथल्या प्राध्यापकांवर आणि कॅण्टीन चालकावर कारवाई होणार आहे. नागपूर विभागातल्या तब्बल 265 महाविद्यालयांना अन्न आणि औषध प्रशासन निभागानं याबाबत पत्रंही पाठवलंय. सध्या सुपरफास्टचा जमाना आहे, आजकाल मुलं महाविद्यालयात जाताना घरचा डबा घेवून जात नाही, तर महाविद्यालयातील कॅण्टीनमध्ये पिझ्झा आणि बर्गरसारख्या खाद्य पदार्थावर ताव मारतात. पण आता हे चालणार नाही. कारण नव्या नियमानुसार फास फूडला कॉलेजमध्ये नो एण्ट्री करण्यात आलंय. नागपूर विभागातल्या तब्बल 265 शाळा आणि कॉलेजेसना अन्न आणि औषध प्रशासनाने पत्र पाठवल्याचे माहिती विभागाचे उपायुक्त शशिकांत केकरे यांनी दिलीय. भिवंडीत उर्दू हायस्कूलच्या पाचव्या मजल्यावरुन 10 वीच्या विद्यार्थिनीने मारली उडी फास्ट फूडवर दररोज ताव मारणाऱ्या मुलांनी या निर्णयाला विरोध केलाय तर काही मुलांनी या निर्णयाचं समर्थन केलंय. फास्ट फूडच्या मुलं आहारी जात असून त्यांना पचनाचे आजार होत आहेत. त्यांची प्रतिकारशक्तीही कमी होत असून लठ्ठपणा वाढत आहे. अनेक पालकांनीही याबाबत तक्रारी केल्या आहेत त्यामुळेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी कॉलेजमधल्या कॅण्टीनवर लक्ष ठेवणार आहेत. सूचना देऊनही जर कॉलेजच्या कॅण्टीनमध्ये हे चमचमीत पदार्थ आढळल्यास तिथले प्राध्यापक आणि कॅण्टीन चालकांवर कारवाई होणार आहे. राणेंचा पक्ष ठरला! 10 दिवसांत मोठा राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत देशपातळीवर झालेल्या आणि अनेक अभ्यासांमध्येही फास्ट फूड हे आरोग्यसाठी हानीकारक असल्याचं म्हटलं आहे. त्याच बरोबर विदेशातही फास्ट फूडच्या अतिवापराबाबत चिंता व्यक्त केली जातेय. फास्ट फूडमुळे लहान मुलांमध्ये ओबेसटी वाढत असल्याचा निष्कर्ष अनेक संशोधनांमध्ये काढण्यात आलाय. पण जोपर्यंत लोकांमध्ये आणि मुलांमध्ये जागरुकता निर्माण होत नाही तोपर्यंत असे निर्णय केवळ बंधन लादून राबवणं शक्य नाही असं मतही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







