मुंबई, 21 ऑगस्ट : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालय (ED )कडून कोहिनूर मिल प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे. तसंच 22 ऑगस्टला चौकशीला हजर राहण्याचे आदेशही राज ठाकरे यांना देण्यात आले आहेत. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज ठाकरे यांच्या ईडीकडून होणाऱ्या चौकशीत काहीही सापडणार नाही,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या प्रकरणात बंधू असलेल्या राज ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांना राज ठाकरेंच्या ईडी नोटिशीवर प्रश्न विचारण्यात आला होता. हेही वाचा - राष्ट्रवादीत मोठी खळबळ, अजित पवारांचा सगळ्यात जवळचा सहकारी शिवसेनेत? दरम्यान, राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर महाराष्ट्रभरातील मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अनेक नेत्यांनी आपआपल्या भागात बंद ठेवण्याचं आवाहनही केलं होतं. पण राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे. राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन “माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, सस्नेह जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून तुमच्या माझ्यावर अनेक केसेस झाल्या, आणि प्रत्येक वेळेस आपण सर्वानी तपास यंत्रणांचा आणि न्यायालयाच्या नोटीसांचा आदर केला आहे, त्यामुळे आपण ह्या अंमलबजावणी संचानालयाच्या(ईडी) नोटिसीचा देखील आदर करू. इतक्या वर्षात आता तुम्हाला आणि मला केसेस आणि नोटिसांची सवय झाली आहे; म्हणूनच माझी तुम्हा सर्वाना विनंती आहे की येत्या 22 ऑगस्टला शांतता राखा. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सामान्य जनतेला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुम्हाला डिवचयचा प्रयत्न होणार पण तरीही तुम्ही शांत रहा. तसंच माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो माझ्यावर तुमच्या सर्वांच्या असलेल्या प्रेमाची मला जाणीव आहे पण तरीही विनंती की कुठल्याही पदाधिकाऱ्याने अथवा महाराष्ट्र सैनिकांनी ईडीच्या कार्यालयाजवळ येऊ अथवा जमू नये. आणि बाकी ह्या विषयावर मला जे बोलायचं आहे ते मी योग्य वेळी बोलेनच.” राज ठाकरेंच्या मदतीला दादूस आला धावून, पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







