मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

एमपीएससीला राज्य सरकारतर्फे विनंती करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

एमपीएससीला राज्य सरकारतर्फे विनंती करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

एमपीएससीला राज्य सरकारतर्फे विनंती करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 जानेवारी : MPSC चे नवीन नियम 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यात आज विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं. अखेर या आंदोलनाची दखल शिंदे सरकारने घेतली आहे. MPSC चे नवीन नियम 2025 पासून लागू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाला तत्वतः मान्यता दिली आहे.

पुण्यात आज एमपीएसीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्य पवार हे दोघेही सहभागी झाल्याने या अराजकीय आंदोलनास आपसूकच राजकीय स्वरूप प्राप्त झालं. खुद्द गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आंदोलन स्थळातून फोन केला.

(भाजपची विनंती अजितदादांनी लावली धुडकावून, राष्ट्रवादी घेणार पंढरपूरचा बदला?)

त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांकडून तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. एमपीएससीला राज्य सरकारतर्फे विनंती करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

आज सकाळी पुण्यात राज्य सेवेच्या नूतन अभ्यासक्रमास 2025 पर्यंत मुदत वाढ मिळावी, या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्य पवार हे दोघेही सहभागी झाले होते. यापूर्वी काँग्रेसनं याच ठिकाणी याच मागणीसाठी हे आंदोलन केलं होतं तिथंच आज भाजपचे दोन आमदार आंदोलन करताना दिसले.

('खोके मिळाले म्हणून की माझ्यामुळे गेला?' संजय राऊतांचा शिंदे गटाला खोचक सवाल)

विद्यार्थ्यांची मागणी आजच्या कँबिनेटमध्ये मान्य झाली तर ते श्रेय आंदोलक परीक्षांर्थींचं असेल, असा दावा आंदोलनात सहभागी झालेल्य़ा तिन्ही आमदारांनी केला. गोपीचंद पडळकर, अभिमन्यु पवार आणि सदाभाऊ खोत तिन्ही फडणवीस समर्थक आमदार आंदोलनाचे नेतृत्व केलं. फडणवीस यांनी फोनवरून संवाद साधून अभ्यासक्रमास मुदतवाढ देण्याचं आश्वासन दिलंय पण जोपर्यंत कँबिनेटमध्ये निर्णय होत नाही पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं आंदोलकांचं म्हणणं होतं.

First published:

Tags: MPSC Examination, Pune