मुंबई, 31 जानेवारी : पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण तापायला लागले आहे. भाजपने बिनविरोध निवडणूक व्हावी अशी विनंती केली आहे. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिल्यांदाच ही पोटनिवडणूक झालीच पाहिजे, असं म्हणत उमेदवार उतरवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. मुंबईमधील राष्ट्रवादीच्या मुख्यालयामध्ये अजित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला आह. त्यांच्यावर कोकण विभागाची अध्यक्षपदाची जबाबदारी दिला आहे तसंच चित्रपट सांस्कृतीक विभागाची जबाबदारी दिली आहे, अशी घोषणाही अजितदादांनी केली. (‘खोके मिळाले म्हणून की माझ्यामुळे गेला?’ संजय राऊतांचा शिंदे गटाला खोचक सवाल) ‘प्रत्येकाला आपली आपली तयारी करायाचा अधिकार आहे. गुरूवार-शुक्रवारी पुण्यात जाणार आहे. आतापर्यंत ७ जणांनी उमेदवारी मागितली आहे.वरिष्ठांशी बोलून पुढचा निर्णय घेणार आहोत. आघाडी होती तेव्हा ती जागा काँग्रेसला सोडली होती. मी प्रत्येकाशी तिथे बोलणार आहे शिवसेना आणि काँग्रेस बरोबर सुद्धा बोलणार पोटनिवडणूक लढवावी यावर मी ठाम आहे. आताचे उदाहरण त्यांनी देणे कितपत योग्य आहे याचा आम्ही आता विचार करत नाही, असं म्हणत अजितदादांनी निवडणूक लढण्याचे स्पष्ट संकेत दिले. ‘संत तुकाराम महाराज यांच्या बाबातीत केलेलं वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. हे वाचळवीर आहेत, ते वारंवार अशी विधानं करत आहे, असं म्हणत अजितदादांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला. ( ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता राष्ट्रवादीत,अजितदादांनी सोपवली जबाबदारी ) आमची अपेक्षा आहे महागाई बाबात केंद्र सरकार दिलासा देईल. राज्याला निधी मिळाला पाहिजे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे असं सांगतात. मुख्यमंत्री पॉझिटीव्ह बोलतात मात्र वेळ काही देत नाहीत. काय चाललंय काही कळत नाही. सत्तेवर नसताना बोलणं खूप सोपं असतं सत्तेत आल्यावर मार्ग काढणे कठीण असते. हे अधिवेशनाच्या तोंडावर सगळे खासदार दिल्लीला गेल्यावर ऐन वेळी ही बैठक लावली. आधी १५ दिवस हे होणे गरजेचे असते अगदी शेवटच्या क्षणी हे करण्यात आले. अमोल कोल्हे मुंबईत होते म्हणून ते गेले, असंही म्हणत अजितदादांनी नाराजी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







