मुंबई, 31 जानेवारी : 'त्यांनी आधी ठरवून घ्यावं, माझ्यामुळे सोडून गेले, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यामुळे गेले किंवा हिंदुत्वाची भूमिका वेगळी होती, त्यामुळे गेले. का खोके मिळाले म्हणून गेले का? याबद्दल त्यांनी खुलासा केला पाहिजे, असा सणसणीत टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
शिंदे गटातील नेते आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक वाद पेटला आहे. याच मुद्यावर संजय राऊत यांनी शिंदे गटाला खडेबोल सुनावले.
'लाठ्या मारा त्यांना दंडूक्याने झोडपून काढा असे भाषण माझ्या माहितीप्रमाणे शितल म्हात्रे यांचं होतं. त्यांचं अलिबागमधील भाषण आहे. त्यांनी आधी ठरवून घ्यावं, माझ्यामुळे सोडून गेले, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यामुळे गेले किंवा हिंदुत्वाची भूमिका वेगळी होती, त्यामुळे गेले. का खोके मिळाले म्हणून गेले. याबद्दल त्यांनी खुलासा केला पाहिजे' असा टोला राऊत यांनी केला.
(भाजपची विनंती अजितदादांनी लावली धुडकावून, राष्ट्रवादी घेणार पंढरपूरचा बदला?)
'ते प्रत्येक वेळी भूमिका बदलतात ते माझ्या ज्या भाषणाचा उल्लेख करतात, माझे भाषण गुवाहाटीला गेल्यावरचे आहे. ते जरा व्यवस्थित ऐका. दंडुक्याने झोडपून काढा, जे पळून गेले यांचा पार्श्वभाग सुजवून काढा असे शितल म्हात्रे म्हणाल्या होत्या. त्यावेळी त्या शिवसेनेत होत्या. त्यानंतर गुवाहाटीला जाऊन मिळाल्या, त्यांचं है वैफल्य आहे, ते प्रत्येक लढाई हरणार आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
'संजय गायकवाड सारख्या फालतू लोकांवर बोलायला मी बांधिल नाही. आमची भूमिका आम्ही काल स्पष्ट केली, असं म्हणत संजय राऊत यांनी गायकवाड यांना फटकारलं.
('महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता राष्ट्रवादीत,अजितदादांनी सोपवली जबाबदारी)
'अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी येतो. घोषणा खूप असतात. इतकीच अपेक्षा आहे की, दोन पाच उद्योगपतींना आणि कॉर्पोर्टरला समोर ठेवून हा अर्थसंकल्प तयार होवू नये. सर्वसामान्यांना डोळ्यापुढे ठेवून बनवला तर स्वागत असेल. नाही तर राहुल गांधी म्हणतात, तसे दोघांसाठी ही अर्थव्यवस्था राबवली जात असेल तर हा देश खड्यात जाईल आणि जात आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sanjay raut