मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /बाळासाहेबांचा विसर पडला, नेहरुंचीच पुण्याई आठवतेय! प्रवीण दरेकरांची संजय राऊतांवर बोचरी टीका

बाळासाहेबांचा विसर पडला, नेहरुंचीच पुण्याई आठवतेय! प्रवीण दरेकरांची संजय राऊतांवर बोचरी टीका

Pravin Darekar Pres Conference . भाजपच्या सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसनं आंदोलन केलं. पण या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. अनेक ठिकाणी गर्दी झाली. माझ्यावर कारवनाई केली, गुन्हे नोंदवले तशी कारवाई मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर करावी अशी मागणीही दरेकरांनी केली.

पुढे वाचा ...

मुंबई, 30 मे : संजय राऊत (Sanjay Raut) आणि शिवसेना (Shivsena) यांना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पुण्याचा विसर पडला आहे. त्यांना सध्या फक्त काँग्रेस आणि जवाहर लाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांची पुण्याई आठवते, अशी जहरी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या 7 व्या वर्षपूर्तीनिमित्त केलेल्या आंदोलनाला लोकांनी प्रतिसादच दिला, नाही असंही दरेकर म्हणाले आहेत.

(वाचा-लसीचा तुटवडा होणार दूर; जून महिन्यात उपलब्ध होणार जवळपास 12 कोटी डोस)

प्रवीण दरेकर यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर परखडपणे मतं मांडली आहेत. मोदी सरकारच्या सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाचा फुसका बार झाल्याचं दरेकर म्हणाले. 7 वर्षात आम्ही काय केलं ते सांगायला तयार आहोत. पण तुम्ही 70 वर्षांत काय केलं ते सांगायला तयार आहात का? असा सवाल त्यांनी केला. कलम 370, महिलांना गॅस, जीएसटी, सामाजिक संतुलन रख्याण्यासाठी तीन तलाकचा निर्णय, CAA अशा मोदी सरकारच्या कामाचा पाढा त्यांनी वाचला. कोरोना संकटाची दोन वर्ष सोडली तर सातत्यानं देशाचा जीडीपी वाढल्याचंही दरेकर म्हणाले.

(वाचा-सुशांतच्या नोकरांची NCB कडून चौकशी, सिद्धार्थ पिठाणीच्या अटकेनंतर कारवाईला वेग)

संजय राऊतांवर टीका करताना च्यांना बाळासाहेबांच्या पुण्याचा विसर पडला असून फक्त जवाहरलाल नेहरू यांची पुण्याई आठवते, असा टोला दरेकरांनी लगावला. भाजपच्या सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसनं आंदोलन केलं. पण या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. अनेक ठिकाणी गर्दी झाली. माझ्यावर कारवनाई केली, गुन्हे नोंदवले तशी कारवाई मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर करावी अशी मागणीही दरेकरांनी केली.

लसीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी मुंबई मनपा आणि राज्य सरकारवर टीका केली. मुंबई महापालिका आणि राज्य सरकार गोंधळलेलं आहे. लसीकरण केंद्राचे उद्घाटन केलं तिथं लस नाही. पण लोक पैसे देवून लस घेत आहेत. जास्तीत जास्त  लोकांनी खाजगी पद्धतीनं लसीकरण करावं, असा यांचा प्रयत्न असल्याचं दरेकर म्हणाले.

लॉकडाऊनबाबत बोलताना दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा फक्त लोकांशी संवाद असता कामा नये. त्यांनी लोकांच्या मागणीचा आणि भावनांचा विचार केला पाहिजे. तुम्ही रुग्णसंख्या आणि मृत्यूचा आकडा मी होत असल्याचं सांगत आहात. तर मग तसा दिलासाही द्यायला हवा, असं दरेकर म्हणाले.

First published:

Tags: Pravin darekar, Sanjay raut, Uddhav thackeray