मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Sushant Death Case सुशांतच्या नोकरांची NCB कडून चौकशी, सिद्धार्थ पिठाणीच्या अटकेनंतर कारवाईला आला वेग

Sushant Death Case सुशांतच्या नोकरांची NCB कडून चौकशी, सिद्धार्थ पिठाणीच्या अटकेनंतर कारवाईला आला वेग

sushant singh rajput suicide case 8 महिने एनसीबीपासून वाचण्यासाठी दोघे मुंबईच्या बाहेर होते. ऑगस्ट महिन्यात ते परतले होते आणि त्यानंतर दोघं वेगवेगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी काम करत होते.

मुंबई, 30 मे : सुशांतसिंह राजपूत आत्महत्येनंतर (Sushant singh Rajput) यात ड्रग्ज प्रकरणाचा (Drugs Case) समावेश असल्याचं समोर येत आहे. या प्रकरणी NCB नं रविवारी सुशांतच्या घरात काम करणारे केशव आणि नीरज यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. या संपूर्ण प्रकरणात ड्रग्जचा कसा सहभाग होता याचा तपास सध्या NCB करत आहे.

(वाचा-VIDEO: उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, दगड मारून फोडली काच)

एनसीबीनं सिद्धार्थ पिठाणीला अटक केल्यानंतर आचा सुशांतसिंह राजपूतकडे काम करणाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. विशेष म्हणजे 8 महिने एनसीबीपासून वाचण्यासाठी दोघे मुंबईच्या बाहेर होते. ऑगस्ट महिन्यात ते परतले होते आणि त्यानंतर दोघं वेगवेगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी काम करत होते.

(वाचा-'डॉन को पकडना नामुमकिन है', पिस्तुलीसोबतच्या फोटोनंतर काही तासात आला दुसरा फोटो)

नीरज आणि केशव याची एनसीबीनं यापूर्वीदेखिल चौकशी केली आहे. पण आता पुन्हा एकदा एनसीबीनं यांना चौकशीसाठी बोलावल्यानं एनसीबीला नवी माहिती मिळाली असल्याची शक्यता आहे. नीरजने यापूर्वी माध्यमांसमोर अनेक खुलासे केले होते. त्यानं सुशांतसह रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, शौविक चक्रवर्ती आणि दीपेश सावंत अशा अनेकांबाबत काही गोष्टी समोर आणल्या होत्या.

काही दिवसांपूर्वीच एनसीबीनं सिद्धार्थ पिठानी (Siddharth Pithani Arrested)  या सुशांतच्या मित्राला अटक केली. गेल्यावर्षी सुशांतच्या मृत्यूनंतर सिद्धार्थ पिठानी हे नाव वारंवार समोर आलं होतं. एनसीबीने सिद्धार्थला हैदराबाद याठिकाणाहून अटक केली आहे. षडयंत्र रचण्यासह एनडीपीएस कायद्याच्या (NDPS Act) कलम 27, 28 आणि 29 अंतर्गत त्याच्यावर विविध आरोप ठेवण्यात आले आहेत. याच प्रकरणात आता तपास पुढे नेण्याचा प्रयत्न एनसीबी करत आहे.

First published:

Tags: NCB, Suicide, Suicide case, Sushant Singh Rajput, Sushant singh rajput case