मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Corona Vaccination लसीचा तुटवडा होणार दूर; जून महिन्यात उपलब्ध होणार जवळपास 12 कोटी डोस

Corona Vaccination लसीचा तुटवडा होणार दूर; जून महिन्यात उपलब्ध होणार जवळपास 12 कोटी डोस

Corona Vaccination latest News केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसरा जून 2021 म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये नॅशनल कोविड व्हॅक्सिनेशन प्रोग्राम अंतर्गत कोरोना लसींचे सुमारे 12 कोटी डोस उपलब्ध होतील.

नवी दिल्ली, 30 मे : देशात सध्या लसीकरणाचा (Corona Vaccination) वेग वाढवण्यावर जोर दिला जात आहे. लसीकरणासाठी लसींची उपलब्धता (Corona Vaccine Shortage) नसल्यामुळं अनेक राज्य केंद्र सरकारवर सतत हल्ला करत आहे. तर सरकारच्या वतीनं देखिल रोज लसीकरण आणि लसींच्या उपलब्धेबाबत माहिती आणि स्पष्टीकरण दिलं जात आहे. मात्र आता केंद्र सरकारच्या वतीनं जून 2021 म्हणजे पुढच्या महिन्यात नॅशनल कोविड व्हॅक्सिनेशन प्रोग्राम अंतर्गत लसींचे सुमारे 12 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.

(वाचा-89 वर्षाच्या आजीला कोरोना होऊन गेल्याचंही कळालं नाही; नातवांनी घेतली पूर्ण काळजी)

यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शनिवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही कोरोनाच्या लसींचे 1 कोटी 82 लाख डोस उपलब्ध असल्याचं म्हटलं होतं. केंद्राने म्हटलं होतं की, आतापर्यंत देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 22.77 कोटींपेक्षा अधिक डोस मोफत आणि प्रत्यक्ष राज्याच्या खरेदी मार्फत उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी लसीकरण झालेल्या आणि वाया गेलेल्या डोसची एकूण संख्या 20 कोटी 80 लाख 09 हजार 397 आहे.

(वाचा-'मी शाकाहारी आहे, आणि माझ्या नावाने मटण शॉप?' 'तो' Video पाहून सोनूही चाट पडला)

देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला मे महिन्यापासून सुरुवात झाली होती. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 1 कोटी 82 लाख 21 हजार 403 डो उपलब्ध आहेत. कोरोना व्हायरसच्या विरोधातील लसीकरण अभियानात आतापर्यंत जवळपास 21 कोटी डोस देण्यात आले आहेत.

दरम्यान, भारतामध्ये डिसेंबर 2021 पर्यंत देशात सुमारे 200 कोटी डोस उपलब्ध होतील असं केंद्र सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना लसींची निर्मिती होईल. त्यामुळं देशातील नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर कोरोना लसीचे डोस उपलब्ध होतील असं केंद्रानं सागितलं आहे. देशात विविध 8 कंपन्यांमार्फत या लसींचे उत्पादन केलं जाणार आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus