Home /News /crime /

दोघेही चांगले डॉक्टर, पण रुग्णाची तपासणी सुरू असतानाच दिला पत्नीला तोंडी तलाक!

दोघेही चांगले डॉक्टर, पण रुग्णाची तपासणी सुरू असतानाच दिला पत्नीला तोंडी तलाक!

दोघेही डॉक्टर पती-पत्नी हे लिंबेजळगावात राहून डॉक्टरांची सेवा करून उपजिविका भागवित होते. याच दरम्यान समिना यांना मुलगी झाली.

    औरंगाबाद, 29 डिसेंबर : केंद्र सरकारने तिहेरी तलाक कायदा (talaq act 2019) आणून मुस्लीम (Muslim)समाजातील तलाक पद्धतीला लगाम घातला. पण, अजूनही कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे प्रकार समोर आले आहे.  औरंगाबाद जिल्ह्यात लिंबेजळगावात उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या रुग्णासमोरच डॉक्टर पत्नीला तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी डॉक्टर पतीविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या डॉ.समिना यांचे लग्न त्यांच्याच नात्यातील डॉ.जमिल शेख यांच्यासोबत 2017 मध्ये झाले होते. समिना यांचं सासर हे सिल्लोडमधील खेडेगावात होतं. त्यामुळे त्या ठिकाणी समिना यांना आपला दवाखाना चालवणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी  लिंबेगावाजवळ स्वखर्चाने भाडे भरून मुलीला आणि जावई जमिलला दवाखाना सुरू करून दिला होता. संजय राऊत यांच्या पत्नी आज ईडी कार्यालयात जाणार? सेनेकडून अद्याप रेड सिग्नल दोघेही डॉक्टर पती-पत्नी हे लिंबेजळगावात राहून डॉक्टरांची सेवा करून उपजिविका भागवित होते. याच दरम्यान समिना यांना मुलगी झाली. मुलगी झाल्यामुळे सासरच्या मंडळीनी डॉ. समिना यांचा छळ सुरू केला. मुलगी झाल्याच्या कारणावरून समिना यांना शिवीगाळ, मारहाण तसंच शारिरीक आणि मानसिक त्रास दिला जात होता. हा वाद दिवसेंदिवस विकोपाला जात होता. 23 ऑक्टोबर रोजी डॉ. समिना या आपल्या रुग्णालयात काम करत होत्या. तेव्हा त्यांचे पती डॉ. जमिल यांच्यासोबत पुन्हा कुठल्या तरी कारणावरून वाद सुरू झाला. दोघांमध्ये रुग्णालयातच भांडण पेटले होते. भांडणात संतप्त झालेल्या जमिल यांनी रुग्णालयात एका रुग्णाचे उपचार सुरू असताना त्याच्यासमोरच डॉ.समिना यांनी तोंडी तलाक दिला. BCCI चा युवराज सिंगला धक्का, निवृत्ती मागे घ्यायची परवानगी नाकारली तोंडी तलाक देणे हा कायद्याने गुन्हा आहे. जमिल यांच्या या कृत्यामुळे समिना यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे थेट वाळूज पोलीस स्टेशन गाठले आणि पती डॉ. जमिल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या