Home /News /sport /

IND vs AUS : अश्विनने मोडला मुरलीधरनचा विश्वविक्रम, हा रेकॉर्ड करणारा पहिलाच

IND vs AUS : अश्विनने मोडला मुरलीधरनचा विश्वविक्रम, हा रेकॉर्ड करणारा पहिलाच

ऍडलेडमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवाचा बदला भारताने (India vs Australia) मेलबर्नच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये घेतला आहे. या मॅचमध्ये भारताचा ऑफ स्पिनर अश्विन (R.Ashwin) याने विश्वविक्रम केला आहे.

    मेलबर्न, 29 डिसेंबर : ऍडलेडमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवाचा बदला भारताने (India vs Australia) मेलबर्नच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये घेतला आहे. शेवटच्या इनिंगमध्ये मिळालेल्या 70 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 2 विकेट गमावून गेला. अजिंक्य रहाणेचं शतक, रविंद्र जडेजाची ऑलराऊंड कामगिरी, बुमराह सिराज आणि अश्विनची बॉलिंग ही भारताच्या विजयाची मुख्य कारणं ठरली. या मॅचमध्ये ऑफ स्पिनर आर.अश्विन (R.Ashwin) याने विश्वविक्रमाला गवसणी घातली. या टेस्टमध्ये अश्विनने 5 विकेट घेतल्या, यापैकी 3 विकेट पहिल्या इनिंगमध्ये तर 2 विकेट दुसऱ्या इनिंगमध्ये होत्या. अश्विनने जॉस हेजलवूडची विकेट घेताच नवीन विश्वविक्रम स्वत:च्या नावावर केला. अश्विनने 192 व्यांदा डावखुऱ्या बॅट्समनला टेस्टमध्ये आऊट केलं. टेस्ट क्रिकेटमधला हा विक्रम आहे. याआधी मुथय्या मुरलीधरनच्या नावावर हा विक्रम होता. मुरलीधरनच्या 800 विकेटपैकी 191 विकेट या डावखुऱ्या बॅट्समनच्या होत्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा जेम्स अंडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. अंडरसनने 186 डावखुऱ्या बॅट्समनना आऊट केलं. त्याआधी या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी अश्विनने पाकिस्तानच्या वकार युनूसचा विक्रम मोडला होता. वकारने टेस्ट क्रिकेटमध्ये 87 टेस्ट मॅचमध्ये 373 विकेट घेतल्या होत्या. आता अश्विनचं लक्ष्य माल्कम मार्शल यांचा विक्रम मोडणं आहे. मार्शल यांनी 86 टेस्टमध्ये 376 विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टेस्ट सीरिजमध्ये अश्विन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या सीरिजच्या दोन टेस्ट मॅचमध्ये त्याने 10 विकेट घेतल्या आहेत. ऍडलेड टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये अश्विनने 4 आणि दुसऱ्या टेस्टमध्ये 1 विकेट घेतली होती. अश्विनच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 73 टेस्ट मॅचमध्ये 375 विकेट आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या