Home /News /entertainment /

'हा' प्रसिद्ध अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वी सुरू होतं RRR चं शूटिंग तर शुक्रवारी केली ख्रिसमस पार्टी

'हा' प्रसिद्ध अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वी सुरू होतं RRR चं शूटिंग तर शुक्रवारी केली ख्रिसमस पार्टी

प्रसिद्ध तेलुगू अभिनेता राम चरण (Ram Charan) कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. याबाबत त्याने चाहत्यांना सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

  मुंबई, 29 डिसेंबर: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता राम चरण (Ram Charan) देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. त्याने एक ट्वीट शेअर करत अशी माहिती दिली आहे की, तो कोरोना पॉझिटिव्ह असला तरी त्याच्यामध्ये कोणतीही लक्षणं नाही आहेत आणि तो घरीच क्वारंटाइन आहे. त्याने लवकरच बरे होण्याची आशा व्यक्त केली आहे. दरम्यान राम चरणने गेल्या काही दिवसात त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. 29 डिसेंबर 2020 रोजी सकाळीच त्याने ही माहिती ट्विटरवरून शेअर केली आहे. त्याने ट्वीट केल्यानंतर चाहते त्याला लवकर बरे वाटण्यासाठी प्रार्थना करत आहेत. हजारो कमेंट्सच्या च्या ट्वीटवर आल्या आहेत. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार 22 डिसेंबर 2020 रोजी हा अभिनेता एस एस राजामौली यांच्या RRR या सिनेमाचं शूटिंग करत होता, त्याच दिवशी त्याने सुश्मिता कोनिडेलाच्या वेबसीरिजसाठी प्रमोशन देखील केलं. (हे वाचा-मलायकाच्या स्वीमसूटमधल्या Hot Photo साठी बॉयफ्रेंड अर्जुनच झाला फोटोग्राफर) दरम्यान 25 डिसेंबरला राम चरणने ख्रिसमस पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यामध्ये त्याचा मित्रपरिवार त्याच्याबरोबर ख्रिसमस एन्जॉय करताना दिसत आहे.
  या ख्रिसमस पार्टीमध्ये अल्लू अर्जून, निहारिका कोनिडेला, वरून तेज, साई धरम तेज, अल्लू शिरिष, अल्लू बॉबी असे अनेक जण उपस्थित होते. मीडिया अहवालानुसार राम चरण याने आचार्य सिनेमाच्या सेटवर या पार्टीनंतर भेट दिली होती. ज्यामध्ये सुपरस्टार चिरंजीवी मुख्य भूमिकेत असणार आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Corona

  पुढील बातम्या