महाराष्ट्रासाठी सर्वात दु:खद बातमी, 24 तासात 2 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

महाराष्ट्रासाठी सर्वात दु:खद बातमी, 24 तासात 2 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

23 एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर नवी मुंबईतील MGM रुग्णालयात उपचार सुरू होते.

  • Share this:

मुंबई, 26 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मुंबईतही सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आहे. कोरोनाशी लढा देणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाबसमोर आली असून नवी मुंबईत आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 2 पोलिसांचा मृत्यू झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

नवी मुंबईत पोलीस हवालदाराला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती.  23 एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर नवी मुंबईतील MGM रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे 04. 40 च्या सुमारास उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा -राज्यातील दुकानं उघडावी का? शिवेंद्रराजे भोसलेंनी सरकारला सुचवला 'हा' पर्याय

दरम्यान, 25 एप्रिल रोजी मुंबईत कोरोनामुळे पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. मुंबईत पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

मृत पोलीस कॉन्स्टेबल 57 वर्षांचा असून वाकोला पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मृत कॉन्स्टेबलच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.

पोलीस हवालदाराच्या पत्नीचा मृत्यू

नवी मुंबईतच एका हेड कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे घरातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली. यामध्ये त्यांची पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. आज या तिघांपैकी कॉन्स्टेबलच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा -तुम्हीही होऊ शकता कोरोना वॉरिअर्स, PM मोदींनीच सांगितली प्रक्रिया

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित हेड कॉन्स्टेबल नवी मुंबई पोलीस मुख्यालयात कर्तृव्यावर होते.  त्याच दरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाली.  त्यांना लागण झाल्यानंतर कुटुंबातील 4 सदस्यांपैकी त्यांचा मुलगा आणि पत्नीलाही लागण झाली. तिघांनाही नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल केलं आहे. आज उपचारादरम्यान, त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. तर मुलीची आज कोरोनाची चाचणी होणार आहे.

पत्नीच्या मृत्यूमुळे पोलीस कॉन्स्टेबलच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे या कुटुंबातील आणखी दोन सदस्य रुग्णालयात लढा देत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: April 26, 2020, 1:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading