जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / राज्यातील दुकानं उघडावी का? शिवेंद्रराजे भोसलेंनी सरकारला सुचवला 'हा' पर्याय

राज्यातील दुकानं उघडावी का? शिवेंद्रराजे भोसलेंनी सरकारला सुचवला 'हा' पर्याय

राज्यातील दुकानं उघडावी का? शिवेंद्रराजे भोसलेंनी सरकारला सुचवला 'हा' पर्याय

‘कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर त्यावर लॉकडाउन हाच सर्वोत्तम पर्याय आहे’

  • -MIN READ
  • Last Updated :

सातारा, 26 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. अर्थव्यवस्था खंडीत होऊ नये म्हणून केंद्र सरकारने काही ठिकाणी अटीशर्थींवर दुकानं उघडण्यास परवानगी दिली आहे. साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्य सरकारला आवाहन केलं आहे. दैनिक सकाळने दिलेल्या वृत्तानुसार,  केंद्र सरकारने ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, त्यानुसार झोन तयार केली आहे. अशा ठिकाणी सर्व दुकानं उघडण्यास परवानगी दिली आहे. यासाठी काही अटी शर्थीही घालून दिल्या आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही अशी परिस्थिती पाहून राज्यातील दुकानं सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, असं आवाहन शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं आहे. हेही वाचा - खाकी वर्दीत दिसली खरी माणुसकी! आजारी मजुराला रुग्णालयात दाखल करून स्वत: भरलं बिल तसंच, लॉकडाउनमुळे बंद असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहे. त्यांच्या हाती रोजगार नाही, त्यांना लवकरात दिलासा मिळावा आणि अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा सुरळीत चालावे,  यासाठी सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही भोसले यांनी केली. संचारबंदी लागू झाल्यामुळे राज्यात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच दुकानं, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे लॉकडाउनचे पूर्ण पालन होत आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर त्यावर लॉकडाउन हाच सर्वोत्तम पर्याय आहे, असं मतही भोसले यांनी व्यक्त केलं. हेही वाचा - ‘त्या’ एका रुग्णामुळे 235 जणांना कोरोनाची भीती, नागपूरकरांमुळे तुकाराम मुंढेंही झाले हैराण ज्या झोन प्रमाणे दुकानं सुरू करण्यास परवानगी दिली आहे, त्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक करावे, तसंच लोकांनी गर्दी करू नये. लोकांनीही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावे. जर असं होत असेल तरच दुकानं उघडली पाहिजे. काही ठिकाणी परिस्थितीही चिंताजनक आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती पाहून सरकारने दुकानं उघडण्याचा निर्णय घ्यावा, असंही आवाहन भोसले यांनी केलं. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात