तुम्हीही होऊ शकता कोरोना वॉरिअर्स, PM मोदींनीच सांगितली प्रक्रिया

तुम्हीही होऊ शकता कोरोना वॉरिअर्स, PM मोदींनीच सांगितली प्रक्रिया

कोरोना लढ्याची माहिती देत असताना नरेंद्र मोदी यांनी सरकारने तयार केलेल्या एका डिजिटल प्लॅटफॉर्मविषयी माहिती दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'द्वारे देशभरातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य केलं. देशातील जनता कोरोनाशी लढा देत आहे, कोरोनाविरोधात भारताचा लढा आदर्शवत आहे. शेतकरी कोरोनाविरोधात लढत आहेत...जनतेला अन्न पुरवत आहेत. नागरिकांनी खूप मोठा त्याग केला आहे,' असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेचे आभार व्यक्त केले आहेत.

कोरोना लढ्याची माहिती देत असताना नरेंद्र मोदी यांनी सरकारने तयार केलेल्या एका डिजिटल प्लॅटफॉर्मविषयी माहिती दिली आहे. 'कोव्हिड वॉरिअर्स' या नावाने सरकारने एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 'या प्लॅटफॉर्मवर आपण विविध घटकांना एकमेकांशी जोडलं आहे. यामध्ये स्थानिक प्रशासन, डॉकर्स, आशा वर्कर्स यांचा समावेश आहे. त्यातून कोरोनाविरोधातील लढाईत प्रत्येकजण आपआपलं योगदान देत आहे. तुम्हीही covidwarriors.gov.in सोबत जोडले जा,' असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

'देशभरात गल्ली-मोहल्ल्यांमध्ये लोक आज एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. गरिबांच्या अन्नापासून, रेशनची तरतूद, त्यानंतर लॉकडाऊनचं पालन, रुग्णालयांची तरतूद, देशांतर्गत वैद्यकीय उपकरणे तयार करणे. आज संपूर्ण देश एकत्रितपणे एक ध्येय, एक दिशेने पुढे जात आहे,' असं नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्या संबोधनातील ठळक मुद्दे:

- देश जेव्हा एक टीम म्हणून काम करत असतो, तेव्हा काय होतं, याचा अनुभव येत आहे

- आयुर्वेद आणि योगाचं महत्त्व जगाला पटलं

- अत्यावश्यक सामग्रीचे देशात वहन सुरू

- मास्क आपल्या जीवनाचं आता अविभाज्य अंग झालं आहे

- तंदुरस्त राहण्यासाठी मास्कचा वापर आवश्यक

- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अपायकारक

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 26, 2020, 12:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading